व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, March 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संकल्प इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात; ‘ग्रामीण भागातील शिक्षण संस्थाचा विकास देशासाठी महत्वाचा’ – धनराज विसपुते

'देशाचा शैक्षणिक विकास होण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थाचा विकास होणे गरजेचे आहे,' असे मत आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांनी व्यक्त केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 17, 2024
in लोकल, ग्रामीण
Sankalp-English-School-Pavananagar

Photo Courtesy : Team Dainik Maval


‘देशाचा शैक्षणिक विकास होण्याच्या दृष्टीने ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थाचा विकास होणे गरजेचे आहे,’ असे मत आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांनी व्यक्त केले. संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाच्या संकल्प इंग्लिश स्कूल पवनानगर या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. ‘ग्रामीण भागात क्रमिक अभ्यासाबरोबरच कौशल्यावर आधारित शिक्षणावर भर देऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांनी प्रयत्न करायला हवे,’ असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

ढोल ताशांच्या आणि लेझीमच्या गजरात यावेळी विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सरस्वती पूजन आणि महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक संस्थापक सचिव लक्ष्मण भालेराव यांनी केले. कार्यक्रमासाठी पश्चिम महाराष्ट्र आर.पी.आय चे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, लायन्स क्लब चे झोन चेअरमन विक्रम माने, लायन्स क्लब आकुर्डी अध्यक्षा मेघना महाजन,उद्योजक असिफ शेख, लायन्स वसंतकुमार गुजर, संकल्प शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय कालेकर, संस्थापक सचिव लक्ष्मण भालेराव, संचालक डॉ. संजय चौधरी, संचालिका विद्या गांधी, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष महादू कालेकर;

आर.पी.आय पुणे जिल्हा सचिव गणेश गायकवाड ,अनिता वाघमारे, युवक आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष समीरअण्णा जाधव,काले पवनानगर चे उपसरपंच रमेश कालेकर, युवक अध्यक्ष अंकुश सोनवणे,सतीश साठे, लायन्स हिरामण गवई, संगीता विसपुते, परिमला कारंजकर , लायन्स राजेश शर्मा, लायन्स व्ही. के. शर्मा, लायन्स मंगला गवई, वसुधा गुजर, लायन्स प्रविण महाजन, लायन्स अर्चना कोळी, ग्रामपंचायत सदस्य छाया कालेकर, सौ. सोनाली संजय चौधरी, ग्रामपंचायत सदस्य उत्तम चव्हाण, शक्ति जव्हेरी,पत्रकार सचिन ठाकर, प्रफुल्ल ओव्हाळ आदी मान्यवर मंडळी व पालक वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (Sankalp English School Pavananagar Annual Convocation Prize Distribution Ceremony)

  • विद्यार्थ्यांनी विविध कलागुण यावेळी सादर केले. यावर्षी महाराष्ट्राची लोकधारा ही थीम निवडण्यात आली होती. यात विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, भूपाळी, शेतकरी नृत्य, धनगर नृत्य, आदिवासी नृत्य, मंगळागौर, कोळीगीत, गोंधळ, लावणी असे विविध नृत्य प्रकार सादर केले. लहान गटामध्ये न्यू ट्रेंड ची विविध गीते सादर करण्यात आली. यात वका वका, बार्बी डॉल, गुलाबी शरारा, बम बम बोले, फ्रेंडशीप साँग, बादल बरसा अशा अनेक गीतांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गड आला पण सिंह गेला या नाटकाने सर्व उपस्थितांची मने जिंकून घेतली.

दरवर्षी शाळेतून गुणवंत विद्यार्थी निवडून त्यास स्टुडंट ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात येतो. संस्थेचे संचालक डॉ. संजय चौधरी यांच्या मातोश्री गोकर्णाबाई श्रीपतराव चौधरी यांच्या स्मरणार्थ या विद्यार्थ्यांला रुपये 25,000 देण्यात येतात. शैक्षणिक वर्ष 2023/24 चा हा पुरस्कार अनुजा यादव व तनुष्का सोनवणे यांना विभागून देण्यात आला. तर टीचर ऑफ द इयर या पुरस्काराने प्रियांका येवले यांना सन्मानित करण्यात आले. सर्व शिक्षकांचा यावेळी संस्थापक सचिव लक्ष्मण भालेराव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नीता कालेकर, सोनल गांधी, बाळू कदम, कैलास येवले, मीनाक्षी शिवणेकर, प्रियांका येवले, सुजाता वाघेरे, आशा बोरकर, मोना गांधी यांनी विशेष मेहनत घेतली सूत्रसंचालन बाळू कदम व मीनाक्षी शिवणेकर यांनी तर आभार मुख्याध्यापक राहुल सोनवणे यांनी केले.

अधिक वाचा –
– ।। राम कृष्ण हरी ।। श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावर अखंड हरीनाम सप्ताह, गाथा पारायण आणि कीर्तन महोत्सवानिमित्त अखंड अन्नदान सेवा
– खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील ‘या’ आदर्श व्यक्ती आणि संस्थांचा होणार सन्मान । MP Shrirang Barne
– मोठी बातमी! अजित पवारांचे सर्व आमदार पात्र, राहुल नार्वेकर यांचा निकाल, शरद पवार गटाचं काय झालं? वाचा सविस्तर


Previous Post

ग्रामपंचायत महागाव, भोयरे आणि पिंपरी येथे शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाबद्दल मार्गदर्शन । Maval News

Next Post

‘डान्स मावळ डान्स’ नृत्य व चित्रकला स्पर्धेत मावळमधील युवा कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग, तब्बल 2300 स्पर्धकांची नोंद । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Dance-Maval -Dance

'डान्स मावळ डान्स' नृत्य व चित्रकला स्पर्धेत मावळमधील युवा कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग, तब्बल 2300 स्पर्धकांची नोंद । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.