Indrayani River Pollution : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा अगदी तोंडावर आला आहे. असे असतानाही अद्याप इंद्रायणी नदीचे प्रदूषण काही कमी झालेले दिसत नाही. देहू, आळंदीत अद्यापही घाट परिसरात नदी फेसाळलेली दिसत आहे. त्यामुळे वारकरी भाविकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
इंद्रायणी नदीला देवनदी असेही म्हणतात. मावळ तालुक्यातून उगम पावणाऱ्या या नदीवर वारकऱ्यांचे श्रद्धास्थळ असलेली श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदी ही ठिकाणे आहेत. आषाढी वारी म्हटलं की संत ज्ञानोबा आणि संत तुकोबांच्या पालख्या पंढरपूराकडे मार्गस्थ होतात. परंतु या पालख्या मार्गस्थ होत असताना त्यापुर्वीच अनेक वारकरी भाविक देहू आळंदीत मुक्कामी असतात. तुकोबांच्या ज्ञानोबांच्या पालखीसह पंढरीकडे जाणारे लाखो वारकरी आहेत. हे वारकरी येथे मुक्कामी असताना त्यांचे इंद्रायणीत स्नान होते, जे त्यांच्यासाठी अत्यंत पवित्र आहे. परंतू प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेल्या इंद्रायणीचे पाणी अंगावर घ्यावे कसे, हा प्रश्न भाविकांना सतावतोय. ( Sant Tukaram Maharaj Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala Dehu Alandi Indrayani river pollution )
त्यातही इंद्रायणीत डुबकी मारताना समोर फेसाळलेले पाणी पाहिले की भाविकांचे मन दुःखी होते. दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देहूत आले होते, तेव्हा एका तरूण वारकऱ्याने मुख्यमंत्र्यांनाच इंद्रायणी प्रदूषणाबद्दल फैलावर घेतले होते. त्यावर अनेक उपाययोजना करण्यासाठी बैठका, आराखडे, प्लॅनिंग झाले.. परंतू इंद्रायणीचे रूप काही बदललेले दिसत नाही. अशात आता जेव्हा प्रत्यक्ष यंदाचा पालखी सोहळा तोंडावर आला आहे. तेव्हाही इंद्रायणी प्रदूषणाच्या विळ्यात दिसत असल्याने सर्वच स्तरातून टीका आणि संताप व्यक्त होत आहे.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे येथे आणखीन एका युवकाला पिस्तूलासह अटक । Talegaon Dabhade
– संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत मावळ तालुक्यातील 278 लाभार्थ्यांना लाभार्थी प्रमाणपत्राचे वाटप । Vadgaon Maval
– दहा हजाराची लाच स्विकारताना तलाठी भाऊसाहेब रंगेहात अटक ! मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना