Dainik Maval News : संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळा परतीच्या मार्गावर (पंढरपूरहून देहूकडे मार्गस्थ होताना) इंदापुरात न येता व थेट वडापुरी येथूनच पुढे मार्गस्थ होणार होता. याबाबत इंदापूर शहर व परिसरातील ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत देहू संस्थानने पालखीच्या परतीच्या मार्गात बदल न करण्याचा निर्णय घेतल्याचे श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी दिली आहे.
श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या परतीच्या मार्गावरील इंदापूर येथील विश्रांती रद्द करून पालखीचा परंपरागत परतीचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु, इंदापुरमधील वैष्णवांनी केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर देहू संस्थानकडून तो निर्णय रद्द करण्यात आला असून यामुळे पालखीचा इंदापूरमधील विसावा कायम राहणार आहे.
- इंदापूरमधील वैष्णवांनी याबाबत देहू संस्थानच्या पालखी प्रमुखांची भेट घेत इंदापूरवरूनच पालखीचा परतीचा प्रवास कायम ठेवावा, अशी मागणी करीत विनंती केली होती. बैठकीस जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे व दिलीप महाराज मोरे यांच्यासह श्रीगुरू बाबासाहेब आजरेकर, हरिदास महाराज बोराटे उपस्थित होते.
दरम्यान, याआधी देहू ते पंढरपूर मार्गावर पालखीचा मुक्काम इंदापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या श्री नारायणदास रामदास हायस्कूल येथे असायचा. मात्र, गेल्या वर्षीपासून हा मुक्काम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या म्हणजे इंदापूर शहराच्या मध्यवर्ती भागापासून दूर अंतरावर गेला आहे. इंदापूरकरांनी पालखी संस्थानचा हा बदल स्वीकारला आहे.परंतु परतीच्या मार्गावरील मुक्कामही बदलला जाऊ नये, यासाठी इंदापूर व परिसरातील नागरिक पुढे आले आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यातील 560 गोशाळांच्या बँक खात्यात 25 कोटी 44 लाखांचे अनुदान जमा ; तुमची गोशाळा असल्यास ‘असा’ मिळवा योजनेचा लाभ
– दिलासादायक ! राज्यातील 64 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार 555 कोटींची विमा नुकसान भरपाई
– राज्यातील महामार्गांवर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर महिलांसाठी सुसज्ज स्वच्छतागृह बांधणार – मंत्री आदिती तटकरे
– तळेगाव शहरातील वाहतुकीत मोठा बदल ; श्री डोळसनाथ महाराज वार्षिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्णय । Talegaon Dabhade