व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

संत तुकाराम कारखान्याकडे जाणारा रस्ता होणार प्रशस्त; दारुंब्रे-कासारसाई रस्त्यासाठी मोठा निधी

पवन मावळातील दारुंब्रे-कासारसाई रस्त्यासाठी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून २ कोटी ८५ लक्ष निधी उपलब्ध झाला असून या कामाचा मंगळवार (दि.६) भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
June 6, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
road-work-bhumi-pujan

Photo Courtesy : Raju Daoundakr


पवन मावळातील दारुंब्रे-कासारसाई रस्त्यासाठी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून २ कोटी ८५ लक्ष निधी उपलब्ध झाला असून या कामाचा मंगळवार (दि.६) भूमिपूजन समारंभ संपन्न झाला.

आमदार शेळके यांच्या पाठपुराव्यातुन अर्थसंकल्पीय कामे २०२२-२३ अंतर्गत प्रजिमा १५७ या कासारसाईकडे जाणाऱ्या मार्गावर सुमारे साडे सहा किलोमीटर रुंदीकरण व सुधारणा करण्यात येणार असून सद्यस्थितीत अरुंद असलेल्या साडेपाच मीटर रस्त्याचे रुंदीकरण करुन सात मीटर रुंद असा प्रशस्त रस्ता करण्यात येणार आहे. साईडपट्ट्यांचे देखील काम होणार आहे. ( sant tukaram sugar factory darumbre to kasarsai road work started )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

संत तुकाराम कारखान्याकडे जाणारे ट्रक, ट्रॅक्टर ट्रॉली अशा अवजड वाहनांची संख्या या मार्गावर मोठ्या प्रमाणात असते. ऊस वाहतूकीच्या हंगामात अवजड वाहनांच्या संथ गतीमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असते. मुळशी तालुक्यात व आयटी पार्ककडे जाणारा हा एक मुख्य रस्ता आहे. तसेच कासारसाई धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यादृष्टीने रस्ता रुंद व्हावा अशी नागरिकांकडून वारंवार मागणी होत होती. आता रुंदीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर या भागातील नागरिकांची वाहतूक कोंडी पासून देखील सुटका होणार आहे.याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

या भूमिपूजन समारंभ प्रसंगी संचालक संत तुकाराम साखर कारखाना सुभाष राक्षे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नथू वाघमारे, अमोल मोकाशी, नितीन मुऱ्हे, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोमनाथ वाघोले, तालुकाध्यक्ष युवक काँग्रेस राजेश वाघोले, अध्यक्ष राष्ट्रवादी शिरगाव भानुदास गोपाळे, सरपंच दारुंब्रे उमेश आगळे, मा.उपसरपंच गणेश वाघोले, ईश्वर वाघोले, काळुराम वाघोले, भरत लिम्हन, बाळासाहेब मोकाशी, युवराज केदारी, उमेश केदारी, निलेश राक्षे, अनिल वाघोले, विशाल वाघोले, जालिंदर वाघोले, संदीप सोरटे, शरद भालेकर आदी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– ‘श्री देवदर्शन यात्रा समिती पुणे’ यांच्याकडून ‘स्वच्छ सुंदर निर्मळ वारी’चे आवाहन । Wari 2023
– शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान झालेल्या मृत्यूच्या घटनांची सखोल चौकशी होणार – जिल्हाधिकारी । Shivrajyabhishek Sohala 2023


Previous Post

मावळ बाजार समितीच्या प्रास्ताविक कामासंदर्भात सभापती संभाजी शिंदेंचे अजित पवारांना निवेदन

Next Post

डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पायी वारी करणाऱ्या महिलांचा ‘मनसे’ सन्मान । Vadgaon Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
mns-vadgaon-maval

डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पायी वारी करणाऱ्या महिलांचा 'मनसे' सन्मान । Vadgaon Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.