ग्रामपंचायत निवडणूका म्हटलं की साधारणतः गटातटाचं राजकारण, पॅनल-टू-पॅनल कार्यकर्ते, खुन्नस आणि आयुष्यभराचा विरोध अशाच गोष्टी दिसून येतात. मात्र सध्या हे वातावरण बदलत असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी काही गावे ही एका विचाराने सोबत चालताना दिसतात आणि अशातूनच सर्वांपुढे काही आदर्शही उभे करतात. ( Sarpanch Post Candidate Lost By One Vote villager Gave Land Car And Cash Prize To Him Gram Panchayat Election )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
खरंतर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत पॅनलचे वर्चस्व असते. अशावेळी एका पॅनलचे उमेदवार दुसऱ्या पॅनलच्या उमेदवाराविरोधात दंड थोपटत असतात. ही लढाई म्हणजे कांटे की टक्कर असते. अशावेळी कुणी एक विजेता हा गुलाल उधळतो तर दुसरा पराभूत उमेदवार घर गाठून पराजयाचं गणित करत बसतो. मात्र, हरियाणा राज्यात एक अनोखी घटना घडली आहे. या घटनेने सर्वजण थक्क झालेत.
हरियाणा राज्यातील फतेहाबाद जिल्ह्यातील नाधोडी गावाने सर्वांसमोर बंधुभावाचे एक आदर्श उदाहरण ठेवले आहे. या गावात अवघ्या एका मताने निवडणूक हरलेल्या उमेदवाराचा ग्रामस्थांनी भव्य जाहीर सत्कार केला आहे. इतकेच नाही तर त्याला पराभूत करणाऱ्यांनीच नंतर त्याला 11 लाख 11 हजार रुपये रोख, 1 स्विफ्ट डिझायर कार आणि पाव एकर जमीन भेट म्हणून दिली आहे. सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी पराभूत झालेल्या या उमेदवाराचे नाव सुंदर कुमार असे आहे. त्याला पराभवाचे शल्य वाटू नये म्हणून ग्रामस्थांनी त्याचा असा खास सत्कार केला आहे. ( Sarpanch Post Candidate Lost By One Vote villager Gave Land Car And Cash Prize To Him Gram Panchayat Election )
अधिक वाचा –
– पंधरावा वित्त आयोग : ग्रामपंचायती होणार मालामाल, पाहा पुणे जिल्ह्यात कोणत्या तालुक्याला किती निधी मिळणार?
– शिळींब ते घुसळखांब रस्ता, आंबेगाव ते दुधिवरे खिंड रस्ता आदी विकासकामांबाबत आढावा बैठक