वडगाव मावळ येथे श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात सालाबाद प्रमाणे ऐतिहासिक दगडी गोटी उचलण्याची स्पर्धा पार पडली. दरवर्षी होळी नंतर पोटोबा महाराज मंदिराच्या प्रांगणात हा शिवकालीन मर्दानी खेळ खेळला जातो. यंदाही मोठ्या हौशेने आणि उत्साहाने तरूण या स्पर्धेत सहभागी झाले होते. तर पहिल्यांदाच काही मुली देखील गोटी उचलण्याचा खेळात सामील झाल्या होत्या. यंदाच्या स्पर्धेत वडगाव शहरातील सौरभ नामदेव ढोरे याने नवा विक्रम रचत पहिला क्रमांक पटकावला. ( Saurabh Dhore first with new record in historic stone goti lifting competition Vadgaon Maval )
सह्याद्री जीम येथे सराव करणारा सौरभ ढोरे हा वडगाव मावळ शहरातील युवक आहे. तो एक नामांकीत वेटलिफ्टर आहे. यंदा त्याने आजवरचे सर्व विक्रम मोडून तब्बल 285 बैठका मारल्या. गेल्यावर्षीचा 270 बैठकांचा विक्रम मोडीत काढत सौरभ ढोरे याने गोटी खांद्यावर घेत तब्बल 285 बैठका मारल्या. यासह नवा विक्रम प्रस्तापित करत सौरभ यंदाचा विजेता झाला. त्याला मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब वाघमारे यांना ‘कर्तव्य दक्ष पुरस्कार’ जाहीर । Vadgaon Maval
– खासदार श्रीरंग बारणे यांचे टेन्शन वाढवणारी बातमी! बाळा भेगडे यांच्यानंतर मावळ लोकसभेसाठी भाजपाच्या ‘या’ नेत्याचे नाव पुढे । Maval Lok Sabha
– अजितदादांच्या आमदाराचा थेट इशारा, ‘…तर आम्ही मावळात शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही’ । Maval Lok Sabha