वडगाव मावळ येथील ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब वाघमारे यांना यंदाचा ‘कर्तव्य दक्ष पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. राजे शिवछत्रपती जयंती महोत्सव समिती वडगाव मावळ यांच्या मार्फत हा पुरस्कार दिला जातो. गुरुवारी (दि. 28 मार्च) होणाऱ्या समारंभात ह्या पुरस्काराचे वितरण केले जाईल. मागील 34 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणारे वाघमारे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
वडगाव मावळ येथे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. दिनांक 25 मार्चपासून शिवजन्मोत्सव सोहळा सुरु होत आहे. या सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात शिवजंयतीच्या दिवशी (28 मार्च – तिथीनुसार) समितीमार्फत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. ह्यावेळी पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे यांना ‘कर्तव्य दक्ष’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. मावळचे आमदार सु निल शेळके, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. तर माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील, अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष अनंता कुडे यांनी दैनिक मावळला दिली. ( Senior Journalist Dnyaneshwar Waghmare has been awarded Kartavya Daksh Award Vadgaon Maval )
34 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत –
वडगाव मावळ शहरात राहून ज्ञानेश्वर उर्फ बाळासाहेब वाघमारे हे मागील 34 वर्षांपासून अविरतपणे पत्रकार म्हणून काम करत आहेत. 1990 सालापासून वाघमारे हे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. सुरुवातीला दैनिक लोकसत्ता मध्ये त्यांनी 10 वर्षे तालुका प्रतिनिधी म्हणून काम केले. त्यानंतर 2000 ते आता 2024 पर्यंत ते दैनिक सकाळमध्ये तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.
प्रामाणिक पत्रकार अशी तालुक्यात ख्याती –
पत्रकारितेच्या 34 वर्षांच्या कारकिर्दीत ज्ञानेश्वर वाघमारे यांनी विविध विषयांवर सडेतोड लिखाण केले. मावळ तालुक्यातील शेती, सहकार, पर्यटन, धरणग्रस्तांचे प्रश्न, पुणे-मुंबई हायवे भुसंपादन आणि शेतकऱ्यांचे प्रश्न, मावळ तालुक्याचे राजकारण, समाजकारण, विविध निवडणूका आदी विषयांवर पत्रकार वाघमारे सडेतोड लिखाण केले. त्यांना आजवरच्या पत्रकारितेच्या प्रदीर्घ प्रवासात 50 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत. पत्रकारितेसह वाघमारे यांनी विविध सामाजिक संस्था, संघटना यांवर देखील काम केले आहे.
अधिक वाचा –
– Maval Lok Sabha : महायुतीत मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा कायम! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…
– महासंगणकाचे जनक आणि ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर । Pune News
– ‘पीडित मुलीला न्याय मिळाला, आता त्या कुटुंबाच्या पाठीशी शेवटपर्यंत राहणार’, कोथूर्णे निर्भया प्रकरणावर आमदार सुनिल शेळकेंची प्रतिक्रिया