व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Maval Lok Sabha : महायुतीत मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा तिढा कायम! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

मावळ लोकसभेचा गुंता महायुतीत काही सुटताना दिसत नाही. सर्वच पक्ष दावेदार आणि एकापेक्षा एक उमेदवार यामुळे महायुतीच्या नेत्यांपुढे मावळ लोकसभेचा तिढा कसा सोडवायचा, हा प्रश्न पडलाय.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 23, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज? मुंबई-पुणे सोडून कालपासून साताऱ्यातच मुक्काम, नेमकं काय झालंय? वाचा सविस्तर

मावळ लोकसभेचा गुंता महायुतीत काही सुटताना दिसत नाही. सर्वच पक्ष दावेदार आणि एकापेक्षा एक उमेदवार यामुळे महायुतीच्या नेत्यांपुढे मावळ लोकसभेचा तिढा कसा सोडवायचा, हा प्रश्न पडलाय. म्हणूनच अद्याप महायुतीचा याठिकाणचा उमेदवार जाहीर झालेला नसून चर्चांचे सत्र सुरु आहे. महायुतीमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघ नक्की कोणत्या पक्षाला द्यायचा, यावर चर्चा सुरु असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात, ‘मावळची जागा शिवसेनेची आहे, पण आपण महायुती म्हणून निवडणूक लढविणार असून महायुतीचे उमेदवार निवडून आणायचे आहेत,’ असे आवाहन शिंदेंनी सहकाऱ्यांना केले. तसेच जागावाटपाची चर्चा सुरू असून लवकरच उमेदवार जाहीर होतील, असेही सांगितले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

मुंबईत शिवसेना शिंदे गटाची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, माजी मंत्री रामदास कदम, गजानन कीर्तिकर, भरत गोगावले, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर आदी उपस्थित होते. ( Maval Lok Sabha Constituency Mahayuti candidate MP Shrirang Barane CM Eknath Shinde )

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून महायुतीचे ठिकठिकाणचे उमेदवार जाहीर होत आहेत. मात्र पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील जागेवर अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची या जागेवर दावेदारी आहे. सध्या जरी येथे शिवसेनेचे खासदार असले तरीही ह्या जागेवर दावा तिन्ही पक्षांनी केलाय. तसेच उमेदवार बदलण्याचीही मागणी महायुतीतूनच पुढे आलीये. त्यामुळे महायुतीसाठी हा मोठा अडसर बनला आहे. एकीकडे शिरूरमधील शिंदे गटाचे समर्थक माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी घेणार असल्याचे निश्चित झाले आहे. दुसरीकडे मावळमध्ये विद्यमान खासदाराला विरोध आणि अन्य पक्षांची दावेदारी, यामुळे शिंदेंचे टेन्शन वाढले आहे.

अधिक वाचा –
– शिरगाव येथील ‘त्या’ मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला महावितरणकडून 4 लाखांची नुकसानभरपाई, आमदार शेळकेंनी आमसभेत दिले होते आदेश
– निवडणूक आचारसंहिता भंगाच्या 63 तक्रारींवर कार्यवाही पूर्ण । Pune News
– महत्वाची बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 28 एप्रिल आणि 19 मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली


dainik maval jahirat

Previous Post

महासंगणकाचे जनक आणि ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना 2024 चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर । Pune News

Next Post

अजितदादांच्या आमदाराचा थेट इशारा, ‘…तर आम्ही मावळात शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही’ । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
vijay-shivtare-ajit-pawar-maval-taluka

अजितदादांच्या आमदाराचा थेट इशारा, '...तर आम्ही मावळात शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही' । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.