केंद्र सरकारच्या फायनान्शिअल इन्क्लुझन अर्थात आर्थिक समावेशन योजना अंतर्गत मावळ तालुक्यातील पवन मावळ विभागातील दुर्गम भाग असलेल्या चावसर, तुंग, मोरवे भागात स्वतंत्र पोस्ट कार्यालय कार्यान्वित झाले आहे. पवन मावळातील पवना धरणाच्या बॅक वॉटर भागात असलेल्या या गावातील नागरिकांना पोस्ट संदर्भात काहीही काम असेल तर थेट 12 ते 15 किलोमीटर अंतर कापत पवनानगर इथे यावे लागत. परंतू आता तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सर्व पाच सहा गावांसाठी स्वतंत्र पोस्ट कार्यालय सुरु करण्यात आले आहे. ( separate post office for chavsar morve tung villages in pavan maval area )
पुणे ग्रामीण पश्चिम विभाग डाकघर अधीक्षक बाळकृष्ण एरंडे यांसह एस. डी. मोरे, सहाय्यक अधीक्षक गणेश वडूरकर, मच्छिंद्र उगले, व्यंकटेश देशपांडे, रेखा गोडघासे, शर्मा मॅडम आदींच्या हस्ते आणि संजय मराठे, सरपंच नवनाथ कुडले, उपसरपंच सुवर्णा राऊत, माजी उपसरपंच भाऊ काळवीट, भावजी राऊत, राणू मोहोळ, निवृत्ती गोणते, निता मोहोळ, लाला वांजळे पाटील, दत्ता मोहोळ, रामू गोणते, श्याम चव्हाण, विठ्ठल गोणते, चिंधू गोणते, ग्रामसेवक आप्पा भानुसे ह्यांच्या उपस्थित नव्या पोस्ट कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.
“ग्रामीण भागातील लोकांचे टपाल वेळेत मिळावे, पोस्ट कार्यालयातील सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता इथे पोस्ट कार्यालय सुरु करण्यात आले आहे. नागरिकांना या पोस्ट कार्यालयाच्या माध्यमातून अपघात पॉलिसी, मासिक बचत खाते, चालू बचत खाते, सुकन्या समृद्धी योजना, मासिक डिपॉझिट, किसान विकास पत्र, 399 किंवा 299 रुपयांत भारतीय डाक अपघात विमा आदी सुविधा प्रदान करण्याचा मानस आहे. तसेच आपल्या गावातच नवीन पोस्ट कार्यालय झाल्यामुळे नागरिकांची पायपीट थांबेल.” – बाळकृष्ण एरंडे, डाकघर अधीक्षक – पुणे ग्रामीण पश्चिम विभाग
पवनानगर पोस्ट मास्टर सोपान वायकर, किसनराव ढोले, शंकर लायगुडे यांचे या कार्यात विशेष सहकार्य लाभले. तर कार्यक्रमातील उपस्थितांचे सरपंच नवनाथ कुडले यांनी आभार मानले. ( separate post office for chavsar morve tung villages in pavan maval area )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील कामशेत इथे तीन देशी बैलांना कत्तलीपासून वाचवण्यात यश!
– तळेगावात अजित फाऊंडेशनमध्ये अॅडविक हाय-टेक कंपनीच्या सीएसआर निधीतून संगणक लॅब
– दैनिक मावळ बुलेटीन : वाचा मावळ तालुक्यातील महत्वाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर