माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट संचलित आश्रमशाळेचे 27 वे स्नेहसंमेलन आज (शनिवार, 11 फेब्रुवारी) रोजी मोठ्यात उत्साहात संपन्न झाले, तसेच यावेळी पालक मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी शाळेतील मुलांच्या वसतीगृह इमारतीचे उद्घाटन देखील करण्यात आले. ( Sevadham Trust Ashram School Malegaon Khurd New Hostel Building Inauguration In Presence of MLA Sunil Shelke )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘सेवाधान ट्र्स्ट मागील 28 वर्षांपासून शिक्षण सेवेचे व्रत अविरतपणे करत आहे. आंदर मावळमधील दुर्गम भागातील आदिवासी मुले या शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण घेत आहेत. समाजातील प्रत्येक घटकांसाठी निस्वार्थ सेवा करण्यासाठी समाजातून अशा दानशुर व्यक्तींनी पुढे आले पाहिजे,’ अही भावना यावेळी आमदार शेळकेंनी व्यक्त केली.
यावेळी आमदार सुनिल शेळके यांच्यासमवेत उद्योजक प्रदीपभाई मेहता, कार्यकारी विश्वस्त डॉ. सत्यजित वाढोकर, माजी नगरसेवक सुरेश धोत्रे, माजी सभापती शंकरराव सुपे, काळुराम मालपोटे, अध्यक्ष संजय गांधी समिती नारायणराव ठाकर, उद्योजक अशोक मेहरा आणि परिवार, विश्वस्त शितल सपकाळ, विश्वस्त मृदुला गोरे, मुख्याध्यापिका प्रमिला भालके, मुख्याध्यापक शिवाजी भोर तसेच आजी-माजी पदाधिकारी, सर्व शिक्षकवृंद, पालक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– आजिवली-जवण ग्रामपंचायतच्या सरपंचपदी नितीन लायगुडे यांची निवड, 1 मताने मारली बाजी
– वडगाव नगरपंचायतकडून ‘मावळ दुर्गा अभियान’, मुलींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे, 17 फेब्रुवारीपर्यंत नोंदणीचे आवाहन
– भंडारा डोंगर पायथ्याजवळ भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार