Dainik Maval News : मावळ तालुका पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने हादरला आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील एका गावात ही संतापजनक घटना घडली असून संबंधित नराधमाला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. तसेच आरोपीला मिळालेल्या पोलिस कोठडीनंतर त्याची रवानगी ही पुण्यातील येरवडा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
प्राप्त माहितीनुसार, पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला त्याच्या घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अल्पवयीन पीडिता ही गरीब कुटुंबातील असून तिच्या परिस्थितीचा फायदा घेत नराधमाने हे गैरकृत्य केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. ( Sexual abuse of a minor girl Lonavala rural police action Accused in Yerawada Jail )
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीवर बी.एन.एस. 65(1), बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,8,12, सह अनुसुचीत जाती आणि अनुसुचीत जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम 3(1) (डब्लू) (आय), 3(2) (व्ही), 3(2) (व्हीए) या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याची रवानगी आता येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक हे करीत आहेत.
अधिक वाचा –
– आषाढी एकादशीला श्री क्षेत्र देहू येथे भाविकांचा मेळा, मुख्य मंदिरात दर्शनासाठी झाली मोठी गर्दी । Dehu News
– रोटरी सिटीकडून भुशी धरण दुर्घटनेत एका मुलीचे प्राण वाचविणारे डॉ. सचिन विटनोर यांना जीवदया पुरस्कार । Talegaon Dabhade
– कान्हे येथील जिल्हा परिषद शाळेत ‘ग्यानबा तुकाराम’च्या जयषोघात रंगला पालखी सोहळा