राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची राजकीय आत्मकथा ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाची सुधारित आवृत्ती आज (मंगळवार, 2 मे) प्रकाशित झाली. मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरला आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. मात्र यावेळी शरद पवार यांनी अचानक आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर निर्णयामुळे एकच खळबळ उडाली सभागृहात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुरत हादरुन गेले आणि लगेचच साहेब निर्णय मागे घ्या, अशी घोषणाबाजी सुरू केली. एवढंच नाहीतर अनेक नेते, कार्यकर्ते रडू लागले. ( Sharad Pawar announces resignation as NCP chief Jayant Patil Jitendra Awhad cried )
जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांसह अनेकांना अश्रू अनावर झालेत. जयंत पाटील यांनी तर, तुम्ही थांबणार असाल तर आम्हीही थांबतो अशी प्रतिक्रिया दिली. तसेच आमदारांनीही आम्ही आमदारकी सोडतो अशी घोषणा केली. तसेच सध्या सर्वजण शरद पवार यांना आपण निर्णय मागे घ्यावा, आताच तो निर्णय घ्यावा, असा आग्रह करत आहेत.
अधिक वाचा –
– Breaking : “मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय”, शरद पवार यांची मोठी घोषणा
– ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिर शाळेत सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प, महाराष्ट्र दिनी उद्घाटन । Talegaon Dabhade