पुणे जिल्हा नियोजन समितीची यादी मंगळवारी (17 जानेवारी) रोजी जाहीर करण्यात आली. यात मावळ तालुक्याचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य म्हणून त्यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्याच्या नियोजनासाठी विशेष ज्ञान असलेले सदस्यांची निवड कलम 3(3) 4(फ) नुसार करण्यात येते, त्यानुसार बाळा भेगडे यांसह एकूण 14 जणांचा समितीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. ( Shinde Fadnavis Government Appoint 20 People On Pune District Planning Committee )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महाराष्ट्र राज्य सरकारने पुणे जिल्हा नियोजन समितीवरील नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित सदस्य अशी मिळून एकूण 20 सदस्यांची यादी मंगळवारी (दिनांक 17 जानेवारी) रोजी जाहीर करण्यात आली. या नवनियुक्त 20 सदस्यांमध्ये विधानसभा किंवा विधानपरिषद किंवा संसद सदस्यांमधून निवडण्यात येणाऱ्या दोन, जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेल्या 4 असे एकूण 6 नामनिर्देशित तर अन्य 14 विशेष निमंत्रित सदस्य आहेत.
राज्यात जून 2022 अखेरीस नवीन शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यामुळे या सरकारने महाविकास आघाडी सरकारने पुणे जिल्हा नियोजन समितीवर केलेल्या नियुक्त्या रद्द केल्या होत्या. त्यामुळे मागील सहा महिन्यांपासून जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित आणि विशेष निमंत्रित सदस्यांच्या जागा रिक्त होत्या. अखेरीस आता त्यावर नव्याने सदस्य नियुक्ती करण्यात आली आहे.
नामनिर्देशित 6 सदस्य
आमदार भीमराव तापकीर, आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री विजय शिवतारे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे महानगरपालिकेतील माजी सभागृह नेते गणेश बीडकर
विशेष निमंत्रित 14 सदस्य
भगवान पोखरकर (वराळे, ता. खेड), माजी मंत्री संजय ऊर्फ बाळा भेगडे (तळेगाव दाभाडे, ता. मावळ), वासुदेव काळे ((दौंड), आशा बुचके (पारुंडे, ता. जुन्नर), राहुल बाबूराव पाचर्णे (बाबुरावनगर, ता. शिरूर), जीवन कोंडे (केळवडे, ता. भोर), पांडुरंग कचरे (काटेवाडी, ता. बारामती), विजय फुगे (भोसरी, ता. हवेली), काळुराम नढे (काळेवाडी, ता. हवेली), प्रवीण काळभोर (कदमवाकवस्ती, ता. हवेली), योगेश टिळेकर (कोंढवा बुद्रूक, पुणे शहर), शरद हुलावळे (कार्ला, ता. मावळ), अलंकार कांचन (उरुळीकांचन, ता. हवेली) आणि अमोल पांगारे (वेळू, ता. भोर)
( Shinde Fadnavis Government Appoint 20 People On Pune District Planning Committee )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! वंचित बहुजन महिला आघाडीची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी सारिका सिंग, पाहा संपूर्ण यादी
– मोठी बातमी! मावळ विधानसभेच्या मनसे पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर, थेट राज ठाकरेंच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान, पाहा संपूर्ण यादी