Dainik Maval News : काश्मीर खोऱ्यामधील पहेलगाम बैसरन घाटी परिसरामध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी (दि. २२) पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला असून 24 पर्यटक जखमी झाली आहेत.
- पहेलगाम येथील या अतिरेकी हल्ल्याचा लोणावळा शहरात शिवसेना पक्षाकडून जाहीर निषेध करण्यात आला, तसेच पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर जाळत तीव्र शब्दांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.
शहर प्रमुख संजय भोईर व युवा सेना अधिकारी विवेक भांगरे यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करत भारत सरकारने या दहशतवादी हल्ल्याला जशास तसे उत्तर देत दहशतवादाचा बिमोड करावा व पाकिस्तानातील धडा शिकवावा अशी मागणी केली.
यावेळी शिवसेना लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, शिवसेना महिला शहर संघटिका मनीषा भांगरे, दीपाली शिरंबेकर, लोणावळा शहर युवा सेना अधिकारी विवेक भांगरे, सल्लागार पराग राणे, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, समन्वयक नंदुभाऊ कडू, उपविभाग प्रमुख नरेश घोलप, केतन फाटक, शाखा यशोधन शिंगरे, परेश वावळे, रिंकू मिश्रा, मोनाली शिंगरे, सायली हारपुडे, यश रेशमे, जाकीर खलिफा आदी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार
