मावळ तालुक्यात ( Maval Taluka ) होणारा वेदांता-फॉक्सकॉन ( Vedanta Foxconn Project ) कंपनीचा सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरात राज्यात हलवण्यात आला. त्यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. मागील आठवड्याच मावळ राष्ट्रवादीकडून ( NCP ) वडगाव शहरात ( Vadgaon City ) याबद्दल मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आता शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांच्या नेतृत्वात मावळ तालुक्यात भव्य जन आक्रोश आंदोलन ( Shiv Sena Rally ) होणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शनिवार ( दिनांक 24 सप्टेंबर ) रोजी या जन आक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 4 वाजता मावळ पंचायत समिती कार्यालयासमोर, वडगाव मावळ, जिल्हा – पुणे येथे ही रॅली होणार आहे. शिवसेनेने या रॅलीसाठी ‘आमचा रोजगार, आमचा हक्क’ ही टॅग लाईनही दिली आहे. महत्वाचे म्हणजे स्वत: युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे या रॅलीला संबोधित करणार आहेत.
महाराष्ट्रात येणारा वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प खोके सरकारने गुजरातमध्ये पाठवून लाखो तरुणांचा रोजगार हिरावल्याविरोधात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जी यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश आंदोलन… pic.twitter.com/r9aHybcie2
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) September 23, 2022
View this post on Instagram
या जन आक्रोश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून एक टीझर जारी करण्यात आला आहे. या व्हिडिओत शिवसेनेने राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ( Shiv Sena Rally Against Maharashtra Government Over Vedanta Foxconn Project Janakrosh Agitation Release Teaser )
अधिक वाचा –
Vedanta Foxconn Project : ‘मावळची सुज्ञ जनता हे कधीही विसरणार नाही’ : आमदार शेळके
व्हिडिओ : ‘अजूनही वेळ गेलेली नाही’, आमदार सुनिल शेळके यांचे निषेध मोर्चात दमदार भाषण