Shiv Sena Eknath Shinde MP Shrirang Barne : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन झाले आहे. यावेळी भाजपाला स्पष्ट बहुमत नसले, तरी एनडीए आघाडीला 292 जागांसह बहुमत आहे. त्यामुळे हे खऱ्या अर्थाने एनडीएचे सरकार आहे. नरेंद्र मोदी यांनीही हे जाणून तातडीने एनडीएच्या घटकपक्षांची मर्जी राखत मंत्रिपदाची शपथ आणि खातेवाटपाचा कार्यक्रम उरकून टाकला. मात्र त्यानंतरही आता एनडीएमधील काही घटक पक्षांमध्ये नाराजी असल्याचे दिसत आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले. त्यांच्या पक्षाचे 7 खासदार निवडून आले. परंतू मंत्रिमंडळात त्यांची फक्त राज्यमंत्रीपदावर बोळवण करण्यात आली. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला एकही मंत्रिपद आले नाही. मावळचे खासदार तथा शिवसेना पक्षाचे प्रतोद श्रीरंग बारणे यांनी यावरून आपली नाराजी जाहीररित्या व्यक्त केली आहे. ( Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne Express His Displeasure For Central Ministerial Post )
शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्यायला हवे होते. एनडीएनतील इतर घटक पक्षांचे एक-एक खासदार निवडून आलेत. मात्र, त्याना कॅबिनेट मंत्रिपद दिले गेले. मग शिंदे गटाबाबत भाजपाने हा दुजाभाव का केला, असा संतप्त सवाल श्रीरंग बारणे यांनी केला आहे.
बारणे यांच्यासोबतच अजित दादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आगामी विधानसभा निवडणूका पाहता राष्ट्रवादीलाही मंत्रिपद दिले पाहिजे होते, अशी खदखद आण्णा बनसोडे यांनी बोलून दाखवली.
“एनडीएमधील इतर घटक पक्षांचे एक-एक खासदार निवडून आले आहेत. मात्र, त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले गेले. मग शिंदे गटाबाबत हा दुजाभाव का केला? एक खासदार असणाऱ्यांना मंत्रिपद द्यायचे होते, तर मग कुटुंबिायांविरोधात जाऊन महायुतीत आलेल्या अजित पवारांनीही मंत्रिपद द्यायला हवे होते. तसेच भजपाने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंनाही मंत्रिपद द्यायला हवे होते.” – श्रीरंग बारणे, खासदार – मावळ
अधिक वाचा –
– आनंदवार्ता ! अयोध्येतील महाराष्ट्र सदनासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून भूखंड मंजूर । Maharashtra Sadan In Ayodhya
– ‘शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात बियाणे, खतांचा पुरवठा करा; प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळण्याची दक्षता घ्या’ – अजित पवार
– नरेंद्र मोदी सरकारचं खातेवाटप जाहीर ! अनेकांची जुनी खाती कायम, कुणाला कोणतं खातं मिळालं? एका क्लिकवर पाहा यादी