शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व जिल्हा संपर्क प्रमुख सचिन आहिर यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरासमोर शनिवारी होऊ द्या चर्चा हा उपक्रम घेण्यात आला. मावळ तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आयोजित करण्यात आलेल्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांनी राज्यातील वाढती महागाई, बेरोजगारी, अत्याचार आदी बाबींचा ऊहापोह करून फसव्या आश्वासनांबाबत राज्य सरकारवर टीका केली. ( Shiv Sena Thackeray group organized Hovu Dya Charcha event in Vadgaon maval )
जिल्हा प्रमुख गौतम चाबुकस्वार, मावळ तालुका संपर्क प्रमुख प्रभाकर पवार, तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, युवा सेना अधिकारी विजय तिकोने, तालुका संघटक अमित कुंभार, उप तालुका प्रमुख अनिल ओव्हाळ, शहर प्रमुख राहुल नखाते, बाळासाहेब फाटक, मारुती खोले, युवराज सुतार, अनिल भालेराव, संतोष शिंदे, संतोष ढोरे, सागर वारुळे, अविनाश राणे, संग्राम ढोरे आदी यावेळी सहभागी झाले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यातील घटनाबाह्य सरकारने फसव्या योजना कागदोपत्री आणल्या. प्रत्यक्षात वाढती महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, वाढती गुन्हेगारी यामुळे सर्वसामान्य माणसाला जीवन असह्य झाले आहे. या बाबत हे सरकार काहीही ठोस पावले उचलत नाही. सर्वसामान्य नागरिकांना हुकूमशाही पद्धतीने वेठीस धरले जात आहे. या प्रश्नांची उत्तरे सरकार देत नाही. त्यासाठीच शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. या वेळी पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ( Shiv Sena Thackeray group organized Hovu Dya Charcha event in Vadgaon maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मुख्यमंत्र्यांची घोषणा! आरोग्य विषयक व्हिजन 2035 जाहीर; नवीन रुग्णालये उभारणार, आरोग्यावर दुप्पट खर्च करणार
– शिवलीतील माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा ऋणानुबंध सोहळा संपन्न; शाळेला केली मोठी आर्थिक मदत
– Breaking! मंगळवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी लगेच वाचा, पुणे लेन ‘इथे’ बंद राहणार