संपूर्ण पुणे जिल्ह्याला हादरवणाऱ्या मावळ तालुक्यातील कोथूर्णे निर्भया प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर सेशन कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. कोथूर्णे निर्भया प्रकरणी आज, शुक्रवार (दि. 22 मार्च) रोजी अंतिम सुनावणी होती. दीड वर्षांपासून ही केस फास्टट्रॅक कोर्टात सुरू होती. सर्व साक्षी पुरावे तपासल्यानंतर आणि सर्व बाजू ऐकूण घेतल्यानंतर कोर्टाने आज आपला अंतिम निकाल सांगितला. कोर्टाने मुख्य आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तर गुन्ह्यात आरोपीला सहाय्य करणाऱ्या त्याच्या आईलाही 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
कोथूर्णे निर्भया प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम –
मावळ तालुक्यातील कोथूर्णे गावातील अल्पवयीन चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैं’गिक अत्या’चार करत खून केल्याची गंभीर घटना 2 ऑगस्ट 2022 रोजी घडली होती. या घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला होता. तर मावळ तालुक्यात संतापाची लाट उसळली होती. याप्रकरणी कामशेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपीला आणि आरोपीच्या आईला ताब्यात घेतले होते. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, आणि चिमुकलीला न्याय मिळावा यासाठी संपूर्ण मावळ तालुक्यात गावोगावी, शहरात मोर्चे आंदोलन करण्यात आले होते. राज्य सरकारनेही या घटनेची गंभीर दखल घेतली होती. अजित पवार यांसह अनेक पक्षाचे नेते, पदाधिकारी पीडित कुटुंबाची भेट घेऊन गेले होते. अखेर हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्यात आला.
दीड वर्ष फास्टट्रॅक कोर्टात केस चालवून शुक्रवारी याचा अंतिम निकाल कोर्टाकडून जाहीर करण्यात आला. ज्यात आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. तर त्याच्या आईला 7 वर्षाचा तुरुंगवास सुनावण्यात आला. या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक संजय जगताप आणि कागदपत्रे तयार करणारे पोलीस हवालदार अजय दरेकर, रवी राय, आशिष झगडे, गणेश तावरे, टिकू दीक्षित आणि संपूर्ण टीम व मार्गदर्शन करणारे वरिष्ठ यांनी याप्रकरणी पीडित कुटुंब आणि निर्भयाला न्याय मिळावा यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. ( Shivajinagar Court Big Verdict In Kothurne Nirbhaya Case Accused Sentenced To Death Maval Taluka Pune District )
अधिक वाचा –
– काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर! महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश, कोल्हापूरमधून शाहू महाराजांना उमेदवारी
– दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक, राजकीय क्षेत्रात खळबळ । CM Arvind Kejriwal Arrested By ED
– मोठी बातमी! मावळ तालुक्यातील कोथूर्णे निर्भया प्रकरणाची शुक्रवारी अंतिम सुनावणी, आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी नागरिकांची मागणी