शिवदुर्ग मित्र लोणावळा यांना रविवारी (दिनांक 1 ऑक्टोबर 2023) रोजी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास एक फोन आला की, एक ट्रेकर्सचा ग्रुप ढाक भैरव गडावर जाताना रस्ता चुकला आहे. श्रीपाद तगलपल्लेवार, क्षितीज गजभिये, अन्शुळ शेंडे, शुभम वाघ, कुणाल ठाकुर, आशिष ठाकरे (सर्व मुळ नागपूर, गोंदिया) अशी ही सर्व मुले नोकरीसाठी पुणे इथे असून ढाक बहिरी गडावर ट्रेकसाठी आले असता रस्ता चुकले होते.
मुलांनी 100 क्रमांकावर संपर्क केल्याने कर्जत, कामशेत पोलीस स्टेशनकडून देखील शिवदुर्ग मित्र टीमला फोन आले होते. त्यानुसार शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे दहा सदस्य लगेच तयारी करून तिकडे बचावासाठी निघाले. मुलांचे लोकेशन मिळाले होते. त्यांना काही सुचना करुन टीम त्यांच्या शोधार्थ निघाली. स्थानिक गावकरी आणि पोलिस अगोदरच शोध घेण्यास गेले होते. त्यांच्या मदतीला शिवदुर्गची टीमही गेली. त्यांनी ढाक गुहेकडचा रस्ता सोडून पुढे ढाक गावाचा रस्ता पकडला होता व गावाच्या जवळपास ते पोचले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
शिवदुर्ग मित्र लोणावळा, स्थानिक ग्रामस्थ, बाळासाहेब पवार पोलिस पाटील, पोलीस कर्मचारी निंबाळकर, सातपुते, ए.पी.आय नम साहेब कामशेत पोलिस स्टेशन यांनी त्यांना जंगलातून सुखरूप बाहेर आणले. मुलांना चालताही येत नव्हते अशा अवस्थेत ती होती. सुनिल गायकवाड, महेश मसने, योगेश दळवी, कपिल दळवी, अमोल सुतार, ओंकार पडवळ, सागर कुंभार, योगेश उंबरे, आनंद गावडे, प्रणय अंबुरे ही शिवदुर्गची टीम या बचावकार्यात होती.
पावसाची संततधार.. दाट धुके.. अंधार आणि शेवाळलेल्या पायवाटा अशा अनेक अडचणींवर मात करत बचावकार्य संपले आणि 6 जणांचे जीव वाचवले. ‘ट्रेकर्सने वातावरण पाहता ढाक भैरव ट्रेक पुढील काही दिवस करु नये, सलग चार ग्रुप या रस्त्यावर वाट भरकटले आहेत,’ असे आवाहन आपदा मित्रांनी केले आहे. ( Shivdurg Mitra Lonavala team saved lives of 6 trekkers who went for trekking to Dhak Bahiri Fort )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– 2 ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती विशेष : “महात्मा गांधीजी आणि तळेगाव दाभाडे शहर यांच्यातील आठवणींना उजाळा
– Breaking! द्रुतगती मार्गावर पुणे लेनवर अपघात, अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
– स्पर्धा परीक्षांमधून पोलिस दलात विविध पदांवर नियुक्त झालेल्या मावळ तालुक्यातील सुपुत्रांचा सत्कार