शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज (बुधवार, 15 मार्च) रोजी मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंचे खंदे समर्थक असलेले आणि राज्याचे माजी आरोग्यमंत्री राहिलेले दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. ( Shock To Uddhav Thackeray Former Maharashtra Health Minister Deepak Sawant Joins Eknath Shinde Shiv Sena Party )
खरे तर उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी कालच (मंगळवार, 14 मार्च) रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता दीपक सावंत यांनीही शिंदेच्या सोबत जाण्याचा निर्णय घेत जाहीर पक्षप्रवेश केल्याने उद्धव ठाकरेंना बसलेला हा मोठा झटका मानला जातो.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दीपक सावंत यांनी बाळासाहेब भवन येथे शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. त्यांच्या सोबतच ॲड.हर्षल चोरडिया आणि एसटी कष्टकरी संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनी देखील शिवसेना प्रणित राष्ट्रीय कर्मचारी संघटनेत प्रवेश केला. यावेळी स्वतः एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आमदार रवींद्र फाटक, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना सचिव संजय म्हशीलकर, शिवसेना प्रवक्ते किरण पावसकर, शिवसेना महिला संघटीका कला शिंदे,अंधेरी विभागप्रमुख अल्ताफ पेवेकर तसेच शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
राज्याचे माजी आरोग्यमंत्री तसेच माजी आमदार @drdeepaksawant यांनी आज बाळासाहेब भवन येथे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यासोबतच ॲड.हर्षल चोरडिया आणि एसटी कष्टकरी संघटनेच्या केंद्रीय कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनी देखील #शिवसेना प्रणित राष्ट्रीय कर्मचारी संघटनेत प्रवेश केला.#ShivSena pic.twitter.com/cQoyswXn4h
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 15, 2023
दीपक सावंत यांचा परिचय ;
दीपक सावंत हे विधानपरिषदेचे माजी सदस्य होते. शिवसेनेकडून त्यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. जुलै 2004 मध्ये त्यांची पहिल्यांदा विधानपरिषदेवर वर्णी लागली. त्यानंतर 2006 आणि 2012 मध्ये ते पुन्हा निवडून आले. डिसेंबर 2014 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात दीपक सावंत यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. याचवेळी त्यांच्याकडे भंडारा आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही जबाबदारी सोपवण्यात आली होती.
अधिक वाचा –
– तिकोणा गडावर झील कॉलेजच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांकडून दुर्गसंवर्धनाचे कार्य
– आंदोलनाला मोठे यश! पुढील निर्णय होईपर्यंत सोमाटणे टोलनाक्यावर टोलमाफी, मंत्री रविंद्र चव्हाणांच्या उपस्थित उपोषण स्थगित