Dainik Maval News : बेकायदेशीरपणे बाळगलेले पिस्तूल बघताना अचानक ट्रिगर दाबला गेला आणि गोळीबार झाला. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. ही घटना शनिवारी (13 सप्टेंबर) रात्री साडेसात वाजता कला डिफेन्स कंपनी येथुन इमर्सन कंपनी रोडवर मिंढेवाडी गावात घडली.
विजय कुमार (वय 28, सध्या रा. मिंढेवाडी, ता. मावळ. मुळ रा चकीया, जिल्हा मोहिहरी, राज्य बिहार), मंजरिन रजिफ मिया (वय 24, सध्या रा. मिंढेवाडी, ता. मावळ. मुळ रा नरकटीया, ता. ढरपा, जि मोहिहरी राज्य बिहार) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस हवालदार शंकर पाटील यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कला डिफेन्स कंपनी येथुन इमर्सन कंपनी रोडने रुमकडे मोबाईल वरती बोलत घरी जात असताना विजयकुमार आणि मंजरिन हे त्यांच्याकडे असलेले बेकायदेशीर पिस्तूल पाहत होते. ट्रिगर मध्ये बोट घालून पिस्तूल गोल फिरवत असताना अचानक ट्रिगर दाबला गेला आणि यामध्ये गोळीबार झाला.
या घटनेत विजयकुमार याच्या हाताला गोळी लागली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विजयकुमार आणि मंजरिन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ग्लास स्काय वॉक प्रकल्पाबाबत विशेष बैठक संपन्न । Lonavala Glass Sky Walk
– अल्पवयीन मुली, महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी
– उर्से खिंडीत गणेशमूर्ती आढळल्याने खळबळ; संकलित केलेल्या मूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन न केल्याने नागरिकांचा संताप । Maval News
– अजित पवार यांच्या सूचनेनंतर चाकणमधील अतिक्रमणविरोधी कारवाईला वेग ; पीएमआरडीएकडून कारवाई सुरू । Chakan News