कार्ला येथील आई एकविरा देवीच्या श्री एकविरा देवस्थान ट्र्स्टच्या विश्वस्त मंडळाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून गुरुवारी (23 फेब्रुवारी) रुट मार्च काढण्यात आला. येत्या रविवारी (दिनांक 26 फेब्रुवारी) रोजी हि निवडणूक होत असून हि सर्व प्रक्रिया शांततेत पार पडावी, परिसरातील कायदा सुव्यवस्थता अबाधित रहावी, यासाठी शिस्त-शौर्य-कायदा यांचे दर्शन घडवणारा रुट मार्च लोणावळा पोलिसांकडून काढण्यात आला होता.
लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनची ही हद्द असल्याने गुरुवारी 23 फेब्रुवारी रोजी मौजे वेहेरगाव येथे श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट निवडणूक अनुषंगाने लोणावळा ग्रामीण पोलिसांनी रॅपिड एक्शन फोर्स आणि पोलिस स्टेशन अधिकारी आणि स्टाफ यांचा रूट मार्च घेण्यात आला. ( Shri Ekvira Devasthan Trust Board Trustees Election Lonavla Rural Police Route March Video )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
श्री एकविरा देवस्थानचा कारभार हा ट्रस्ट आणि विश्वस्त मंडळ यांच्या माध्यमातून पाहिला जातो. मात्र, सन 2015-16 साली झालेला संघर्ष यामुळे हा वाद कोर्टात गेला आणि तेव्हा पासून विश्वस्त मंडळ बरखास्त करुन तिथे प्रशासक समिती कारभार पाहत होती. मात्र आता ही निवडणूक होत असून नव्याने विश्वस्त मंडळ नियुक्त करण्यात येणार आहे. एकूण 4 जागा असून यासाठी तब्बल 27 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
एकविरा देवीची वर्षातून दोनदा यात्रा भरते, त्यासाठी विश्वस्त मंडळ असणे आवश्यक आहे, त्यामुळे हि निवडणूक होत आहे. विश्वस्त मंडळावर काही पदसिद्ध सदस्य असतात, यांत पुजारी पैकी संजय गोवलिकर यांचा एकमेव अर्ज आल्याने ते बिनविरोध सदस्य झालेत. गावचे सरपंच हे पदसिद्ध सदस्य म्हणून अर्चना देवकर यांचा एकमेव अर्ज असल्याने त्याही बिनविरोध सदस्य बनल्या आहेत.
गुरव परिवारातून तीन पदसिद्ध जागा असून पैकी एका दगडू त्रिंबक देशमुख यांच्या जागी नवनाथ रामचंद्र देशमुख हे एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध सदस्य बनलेत तर, उर्वरित दोन पदसिद्ध गुरव जागांसाठी नथू दगडू देशमुख आणि राघु त्रिंबक देशमुख व कोंडू बहिरु देशमुख या अनुक्रमे दोन तक्षिमेतील जागांसाठी एकूण सहा अर्ज आले आहेत. तर भाविकांपैकी दोन जागांसाठी एकूण 21 अर्ज दाखल झाले आहेत. हि निवडणूक रविवारी वेहेरगाव भक्तनिवास येथे पार पडेल.
अधिक वाचा –
– दैनिक मावळ विशेष । आठ हजारहून अधिक सरपंच, ग्रामसदस्यांना वक्तृत्व कौशल्याचे धडे देणारे मावळरत्न ‘विवेक गुरव’
– गुडन्यूज! शिधापत्रिकाधारकांना फेब्रुवारीच्या धान्यासोबतच जानेवारीचे धान्य, मोबाईल क्रमांक जोडण्याचेही आवाहन