वडगांव मावळ ( Maval News ) येथील महादेव मंदिर या ठिकाणी महाशिवरात्री (18 फेब्रुवारी) निमित्ताने पहाटे 5 वाजता विश्वस्त सचिव अनंता कुडे, विश्वस्त तुकाराम ढोरे, अरुण चव्हाण, किरण भिलारे, चंद्रशेखर सोपानराव म्हाळसकर यांचे हस्ते अभिषेक संपन्न झाला. त्यानंतर सकाळी 8 वाजता रूढी -परंपरेने चालत आलेला श्री पोटोबा महाराज आणि सांगवी येथील जाखमाता देवी या ठिकाणी पालखी सोहळा नेऊन भाऊ बहीण भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. ( Shri Potoba Maharaj And Jakmata Devi Meet Tradition In Vadgaon Maval Sangvi Village On Mahashivratri Day )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या प्रसंगी सांगवी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. त्यानंतर तेथील पुजारी भक्त कैलास खांदवे, शंकर पवार आणि देवस्थानचे विश्वस्त यांचे हस्ते श्री पोटोबा महाराज आणि जोगेश्वरी माता यांना इंद्रायणी नदीत स्नान करण्यात आले. नंतर देवस्थानच्या वतीने जाखमाता देवीला साडी, ओटी, खन, नारळ यांचा मान देण्यात आला. सांगवीमधील भजनी मंडळ आणि काकडा आरती भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. नंतर उपस्थित भाविकांना उपवासाच्या निमित्ताने फराळ, प्रसाद वाटप करण्यात आला.
हेही वाचा – मावळ तालुक्यातील ही प्रसिद्ध शिवमंदिरे प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी नक्की पाहावीत, जाणून घ्या
या प्रसंगी देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, उपाध्यक्ष गणेश ढोरे, चंद्रकांत ढोरे, सुभाषराव जाधव, सुनिता कुडे, विणेकरी बबनराव भिलारे, शंकरराव म्हाळसकर, सुदामराव पगडे, पंढरीनाथ भिलारे, देवराम कुडे, सोपान मधुकर म्हाळसकर, मधुकर पानसरे, बाळासाहेब चव्हाण, हरियाली पानसरे, पुजारी समीर गुरव, ज्ञानेश्वर म्हाळसकर, रविंद्र तुमकर, महादू खांदवे आदींसह भाविक उपस्थित होते. दिवसभर महादेव मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी झाल्याने यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
अधिक वाचा –
– आरपीआयचे शशिकांत बेल्हेकर यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी, थेट राज्यस्तरीय पदावर नियुक्ती
– मावळ ग्रामीण पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर! अध्यक्षपदी विजय सुराणा, उपाध्यक्षपदी सचिन ठाकर, वाचा संपूर्ण यादी