वडगाव मावळ ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज देवस्थान, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तसेच इतर हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने काढण्यात आलेल्या श्रीराम मंदिर अक्षता मंगल कलश यात्रेचे नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. दिनांक 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्यानगरीत श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्या सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास अयोध्या येथून श्री राम मंगल अक्षता कलश येथे आणण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
रविवारी ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरपासून पालखीमधून वाजत-गाजत अक्षता कलशाची मिरवणूक काढण्यात आली. ब्राम्हणवाडी येथील मुलींचे लेझीम पथक, वसतिगृहातील मुलांचे पथक व भगव्या टोप्या घालून कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. डिजेवरील रामलल्लांच्या गाण्यांमुळे वातावरण भक्तिमय झाले होते. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी कलशाला ओवाळले तसेच नागरिकांनी कलशाचे दर्शन घेतले. ग्रामदिंडी प्रदक्षिणा होऊन मंदिरात सामूहिक श्रीराम भजन, महाआरती झाली. प्रसाद वाटपही करण्यात आला.
देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, सचिव अनंता कुडे, ॲड. दामोदर भंडारी, सुधाकर ढोरे, संभाजीराव म्हाळसकर, किरण म्हाळसकर, नितीन कुडे, रवींद्र काकडे, प्रसाद पिंगळे, गणेश भेगडे, किरण भिलारे, महेंद्र म्हाळसकर, अमोल पगडे, मोरेश्वर पोफळे, दीपक बवरे, तुषार वहिले, योगेश म्हाळसकर, सोमनाथ काळे, प्रशांत भिलारे आदींसह युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अधिक वाचा –
– वडगाव शहरातील दिव्यांग बांधवांना मोरया प्रतिष्ठानकडून अत्यावश्यक साहित्यांचे वाटप
– मावळ भाजपाच्या गाव भेट दौऱ्याला नाणे मावळ भागातून सुरुवात! पक्षाचे अनेक नेते, पदाधिकाऱ्यांचा दौऱ्यात समावेश
– ग्लास स्कायवॉक प्रकल्पासाठी 333 कोटींचा निधी मिळवून दिल्याबद्दल आमदार सुनिल शेळकेंचा नागरिकांकडून जंगी सत्कार