श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची 33 वी वार्षिक सभा ( Annual Meeting ) हिंजवडी (तालुका मुळशी) येथे झाली. या वार्षिक सभेला अध्यक्ष विदुरा नवले ( Vidura Navale ) , उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, अनिल लोखंडे, कार्यकारी संचालक एस. जी. पठारे आदी उपस्थित होते. यावेळी अनेक ठराव करुन ते एकमताने मंजूर करण्यात आले.
श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याकडून ( Shri Sant Tukaram Sahakari Sakhar Karkhana ) 92 कोटी रुपये खर्चाचा इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारखाना ‘ए’ ग्रेड साखर निर्मितीसाठी प्रयत्न करत आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष विदुरा नवले यांनी दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ ( Maval Taluka ) आणि मुळशी तालुक्यातील ( Mulshi Taluka /) एक हजार शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन कमी आहे. या तालुक्यांतील शेतकऱ्यांनी एकरी ऊस उत्पादन वाढवावे, तरच शेती परवडेल. उत्पादन वाढवण्यासाठी कारखान्याने प्रशिक्षणाची सोय केली आहे, त्याचा लाभ घ्यावा, अशी माहिती देखील नवले दिली. ( Shri Sant Tukaram Sahakari Sakhar Karkhana Annual Meeting )
अधिक वाचा –
सोमाटणे फाट्यावर ‘शोले’चा सीन, महावितरणच्या टॉवरवर चढला तरुण, 50 फूट उंचीवर लोंबकळत राहिला अन्…
महिलेवर लैंगिक अत्याचार करुन 66 लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल, दोनजण अटकेत I Dehu Road Police