आंदर मावळातील नागाथली गावात गुरुवारी (दिनांक 11 मे) रात्री दोनच्या सुमारास एका गोठ्याला अचानक लागलेल्या आगीत सहा म्हशींचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर एक म्हैस जखमी झाली आहे. या दुर्घटनेमुळे शेतकरी रामदास माऊली खांडभोर यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. परंतू आगीमुळे संपूर्ण गोठा जळून खाक झाला आहे. गोठ्यात सात म्हशी होत्या. त्यापैकी सहा म्हशींचा मृत्यू झाला तर एक म्हैस गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच खासदार श्रीरंग बारणे यांनी याप्रकरणी मावळचे तहसीलदार यांना तात्काळ घटनास्थळी जात पंचनामा करण्याचे आदेश दिले. तसेच शासनस्तरावरुन नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत सूचना केल्या आहेत. ( Six buffaloes died due to fire in Nagathali village of Andar Maval )
अधिक वाचा –
– प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेले किशोर आवारे यांचे निधन, मावळ तालुक्यात खळबळ । Kishor Aware Murder News
– ‘चांदणी चौकातील उड्डाण पुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव द्या’, सुप्रिया सुळेंची मागणी