व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘चांदणी चौकातील उड्डाण पुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव द्या’, सुप्रिया सुळेंची मागणी

पुण्यातील प्रसिद्ध चांदणी चौक इथे होत असलेल्या उड्डाण पुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट याचे नाव द्यावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 12, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
Supriya-Sule-nitin-gadkari

Photo Courtesy : IG / Supriya Sule


पुण्यातील प्रसिद्ध चांदणी चौक इथे होत असलेल्या उड्डाण पुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट याचे नाव द्यावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

काय म्हणाल्यात सुप्रिया सुळे?

“पुणे शहरातील चांदणी चौक इथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरु आहे. या परिसरातील वाहतूक कोंडी व अपघात यावर उपाययोजना करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि केंद्र शासनाकडे यापुर्वी सातत्याने पाठपुरावा सुरु होता. यावर चांदणी चौकात पुलाचे काम नव्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार काम देखील सुरु आहे. आता हे काम अंतीम टप्प्यात आहे.”

“हा पूल मुळशी तालुका, पुणे शहर आणि परिसराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यासोबतच तो पुणे-सातारा-बंगळुरू महामार्गावरील एक महत्वाचे ठिकाण असणार आहे. मुळशी तालुक्यास ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. याच तालुक्यात थोर स्वातंत्र्यसेनानी सेनापती बापट यांनी 1921 साली शेतकरी व भूमीपुत्रांच्या संघर्षाची पहिली मोठी नोंद असणारा ‘मुळशी सत्याग्रह’ केला.या सत्याग्रहाला नुकतीच शंभर वर्षे पुर्ण झाली आहेत.”

“देशाच्या स्वातंत्र्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनांपैकी हे एक महत्त्वाचे आंदोलन अशी त्याची नोंद आहे. यानिमित्ताने या सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांच्या स्मरणार्थ चांदणी चौक येथील उड्डाण पुलास त्यांचे नाव देऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करता येणे शक्य आहे. यासाठी माझी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री मा नितीनजी गडकरी यांना विनंती आहे की कृपया आपण यासंदर्भात सकारात्मक विचार करुन यासंदर्भात निर्णय घ्यावा.”

अधिक वाचा –
– अवैध पार्कींग झोन निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा; देहूरोड फाट्यावर सिग्नल बसवण्याचीही मागणी
– “मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा”


dainik maval jahirat

Previous Post

अवैध पार्कींग झोन निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा; देहूरोड फाट्यावर सिग्नल बसवण्याचीही मागणी

Next Post

जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल । Kishor Aware

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
kishor-aware

जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला, रुग्णालयात दाखल । Kishor Aware

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.