जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर खूनी हल्ला केला. त्यापैकी दोघाजणांनी गोळीबार केला. तर दोन जणांनी कोयत्याने वार केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, किशोर आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते. जखमी अवस्थेतील आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अधिक वाचा –
– अवैध पार्कींग झोन निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा; देहूरोड फाट्यावर सिग्नल बसवण्याचीही मागणी
– ‘चांदणी चौकातील उड्डाण पुलाला मुळशी सत्याग्रहाचे नायक सेनापती बापट यांचे नाव द्या’, सुप्रिया सुळेंची मागणी