पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचा आज (रविवार, दिनांक 30 एप्रिल) शंभरावा भाग होता. मन की बात कार्यक्रमाच्या शंभराव्या भागानिमित्त मावळ भाजपाकडून अनेक ठिकाणी थेट प्रक्षेपणाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांनी ठिक ठिकाणी सामन्य जनतेसह हा कार्यक्रम पाहण्याचे नियोजन केले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी भाजपाच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष नितीन पोटे यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम कार्यकर्ते आणि नागरिकांसमवेत पाहिला. यावेळी 100 व्या मन कि बात कार्यक्रमाचे औचित्य साधून राज्यस्तरीय शिष्यवृत्ती स्पर्धेत राज्यात कुमारी स्नेहा पाटील हिचा राज्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल सत्कार करून सन्मान करण्यात आला. स्नेहा पाटील हि तळेगाव दाभाडे येथील रहिवासी आहे. यावेळी तालुका युवाध्यक्ष संदीप काकडे, नितीन पोटे, निर्मला पोटे, विनायक भेगडे, प्रभागातील सर्व महिला आदी उपस्थित होते.
दिनांक 3 ऑक्टोबर 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशाला संबोधित करत आहेत. विविध मुद्द्यांवर नागरिकांना जोडून घेणं आणि देशाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींकडे लक्ष वेधून घेणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ( Sneha Patil who won first position in state level scholarship examination felicitated by Bala Bhegde talegaon dabhade )
अधिक वाचा –
– फिरायला जाताय? ट्राफिकमध्ये अडकाल… घाटात वाहनांच्या रांगाच रांगा । Mumbai Pune Expressway Traffic Jam
– वेहेरगाव इथे गावठी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावर लोणावळा ग्रामीण पोलिसांचा छापा, 1600 लीटर दारू जप्त