वडगाव मावळ येथे श्रीराम नवमी उत्सव समितीच्या माध्यमातून मागील 46 वर्षांपासून श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येतोय. यावर्षी हभप पांडुरंग महाराज गायकवाड यांचे देवजन्माचे प्रवचन झाले. या कार्यक्रम प्रसंगी श्री पोटोबा देवस्थानचे विश्वस्त सचिव अनंता कुडे यांना श्रीराम सामाजिक पुरस्कार, तर डॉ तृप्ती शहा यांना श्रीराम सामाजिक (वैद्यकीय)पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
वडगावमधील जेष्ठ समाजसेवक स्वर्गीय ज्ञानेश्वर तुकाराम गाडे आणि स्वर्गीय श्रीमती पार्वती शंकरराव कदम यांच्या स्मरणार्थ मागील वर्षांपासून समाजामध्ये सामाजिक बांधिलकी जपून सेवाभावी समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान संस्थेच्या वतीने केला जातो. त्या अनुषंगाने या वर्षी अनंता कुडे यांना त्याच्या अनेक वर्षांपासूनच्या गणेशउत्सव मंडळ सदस्या पासून झालेली सामाजिक कार्याची सुरवात ते आता पर्यंत तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थान चे सचिव पद सांभाळून केलेल्या पारदर्शक, निःस्वार्थ सेवाभावी कार्याची दखल घेऊन समितीचे वतीने सन्मानित करण्यात आले. ( Social Award To Ananta Kude And Dr Trupti Shah Vadgaon Maval )
तसेच डॉ, तृप्ती शशिकांत शहा यांनी गेले 50 वर्षांपासून वैद्यकीय सेवेमध्ये अनेक गरजू रुग्णांला अतिशय माफक स्वरूपात केलेल्या सेवाकार्यांची तसेच वडगांव मध्ये सर्वात प्रथम महिला भजनी मंडळ स्थापन करून, तसेच गावातील अनेक महिलांना त्या काळात विमान प्रवास घडवून खऱ्या अर्थाने महिलांचे सबलीकरण करून त्यांना एकत्र व्यासपीठ निर्माण करून देत असतांना या सर्व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अधिक वाचा –
– किशोर आवारे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी चंद्रभान खळदे याना कोर्टाकडून सशर्त जामीन मंजूर । Talegaon Dabhade
– प्रत्येक रसवंती गृहाचं नाव ‘कानिफनाथ’ किंवा ‘नवनाथ’ असंच का असतं? वाचा रसवंती गृहाच्या जन्माची कहाणी
– अखेर ठरलं तर..! ‘या’ तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार, महायुतीच्या उमेदवारांसाठी घेणार प्रचार सभा