मावळ तालुक्यातील महागाव ग्रामपंचायत मध्ये हॅन्ड इन हॅन्ड इंडिया सामाजिक संस्था आणि फिन्चम इंडिया यांच्या मार्फत सौर पथदिवे बसवण्यात आले आहेत. ह्या पददिव्यांचा लोकार्पण सोहळा बुधवारी (दिनांक 23 ऑगस्ट) रोजी पार पडला. सौर पथदिव्यांचे उद्घाटन Rufus Davidson (CSR Lead KONE Elevator) यांच्या हस्ते झाले. ( Solar street lights at 35 places in Mahagaon Gram Panchayat Maval Taluka )
गावात एकूण 35 ठिकाणी सौर पथदिवे बसवण्यात आले आहेत. याकामे ग्रामपंचायतचे विशेष सहकार्य लाभले. महागाव हे गाव डोंगरात वसलेले असल्यामुळे तिथे साप, विंचू आदींचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रात्री अंधारात घराबाहेर पडणे अवघड काम असते. अशात या सौरदिव्यांमुळे दुर्गम भागांत रात्रीचीही लाईटची व्यवस्था होणार आहे आणि रात्रीच्या वेळी सुरक्षितरित्या घराबाहेर पडणे सोईस्कर झाले आहे. सदर उपक्रमामुळे शाश्वत उर्जा उपायांच्या दिशेने गावाच्या विकासात भर टाकली आहे.
कार्यक्रमाला गावच्या सरपंच स्वाती बहिरट, उपसरपंच पांडुरंग पडवळ, ग्रामपंचात सदस्य संतोष घारे, आरती घारे, शिक्षक धोंडिबा घारे, भगवान सावंत, भानुदास बहिरट, बचत गटातील महिला, ग्रामस्थ आणि हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्थेचे सदस्य अनिल पिसाळ, अभिजित अब्दुले, ओंकार कुलकर्णी, शेखर खराडे, सारिका शिंदे, कविता ढोकरे, अश्विनी खराडे, पांढरीनाथ बालगुडे उपस्थित होते.
हॅन्ड इन हॅन्ड इंडिया ही एक सामाजिक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. मागील आठ वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यामध्ये महिला बचत गट सक्षमीकरण, महिला कौशल्य विकास आणि उद्योग निर्मिती, नैसर्गिक संसाधने विकास अशा विविध सामाजिक विषयावर गरिबी निर्मूलन व रोजगार निर्मितीचे कार्य करत आहे. ( Solar street lights at 35 places in Mahagaon Gram Panchayat Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– सोज्ज्वळ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन, कलाविश्वावर शोककळा
– मावळ तालुक्यातील धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक; ‘आता ही शेवटची मिटींग, महिन्यात निर्णय झाला नाही तर…’
– श्रावणातील नाग-नरसोबाचा कागद म्हणजे प्राचीन मातृका पुजनाचे आधुनिक रुप – दैनिक मावळ श्रावण विशेष लेख