मावळ तालुक्यातील जनतेसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. दिनांक 14 मार्च रोजी झालेल्या सोमाटणे टोलनाका हटवा आंदोलनाला आलेले यश म्हणजे मावळमधील वाहनचालकांना मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीपर्यंत टोलमध्ये मिळालेली माफी. मात्र तरीही आंदोलनाच्या दिवसापासूनच तालुक्यातील अनेक वाहनचालकांच्या फास्टॅगमधून सोमाटणे टोलनाका इथे पैसे कट झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर आता आयआरबी प्रशासनाने एक पत्रक कृती समितीला पाठवून आपण हे पैसे परत करण्यास तयार असल्याचे सांगितले आहे. ( Somatne Toll Naka Removal Movement Maval Taluka IRB Administration Letter Car Toll Exemption )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हटलंय आयआरबी प्रशासनाने?
आयआरबी प्रशासनाच्या उच्चतम अधिकाऱ्याने सामाटने टोल विरोधी कृती समिती (ता. मावळ, जि. पुणे) यांना पत्र लिहिले आहे. ज्यात Fastag च्या माध्यमातुन मावळ विभागातील कारचे पथकर कपात होत असल्याबाबत स्पष्टपणे लिहीले आहे की, मंत्री रविंद्र चव्हाण (सार्वजनिक बांधकाम विभाग) यांनी दिनांक 14 मार्च रोजी दिलेल्या संदर्भीय सुचने नुसार आमचे कडून पालन करण्यात येत आहेत. तसेच, मुख्यमंत्र्यांसोबत दिनांक 28 मार्च नंतर बैठक आयोजित करण्यात येणार आहे, त्या बैठकी मध्ये दिल्या जाणाऱ्या सुचने नुसार आमचे कडुन पालन करण्यात येणार आहे. मात्र, ज्या स्थानिक विभागातील कारचे Fastag मधून सोमाटने पथकर नाक्यावर पथकर कपात झालेली आहे, त्या स्थानिक कारचे आर.सी बुक आणि आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी करून खातरजमा केल्या नंतरच संबंधीत वाहनधारकाच्या (स्थानिक कार ) बैंक खात्यावर Fastag ( फास्टॅग ) द्वारे वजावट झालेले पैसे जमा करण्याची दक्षता घेण्यात येईल., असे पत्र आयआरीबी अधिकाऱ्यांनी लिहून कृती समितीला पाठवले आहे. मिलिंद अच्युत यांनी दैनिक मावळला हि माहिती दिली.
अधिक वाचा –
– कार्ला फाटा जवळ भीषण अपघात; मनसे पदाधिकाऱ्यांकडून अपघातास कारण ठरलेल्या गाडी चालकाला जागेवरच ‘प्रसाद’
– बिल्डर्स सुविधा देत नाही, तरीही पीएमआरडीएकडून सदनिका पूर्णत्वाचा दाखला मिळतोच कसा? – आमदार शेळके