Dainik Maval News : आपण नेहमीच सर्वांना बरोबर घेऊन पुढे जाण्याच्या भूमिकेतूनच काम करतो. आपण कधीच फक्त भावकीचा विचार केला नाही. आपण गावकीचा विचार करून तालुक्यातील प्रत्येक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला, असे मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-भाजप-शिवसेना-आरपीआय- स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष महायुतीचे उमेदवार सुनील शेळके यांनी सांगितले.
महायुतीचे उमेदवार सुनील शेळके पवनानगर, शेवती वसाहत, कडधे, ओझर्डे, राऊतवाडी, बौर या गावांचा जनसंवाद दौरा केला. त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे,आरपीआय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला अध्यक्ष दीपाली गराडे तसेच ज्येष्ठ नेते गणेशअप्पा ढोरे, विठ्ठल शिंदे,पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, आदी पदाधिकारी होते.
पवन मावळात ठिकठिकाणी आमदार शेळके यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ढोल-ताशा व डीजेच्या दणदणाटात रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची उधळण आणि औक्षण करीत सर्व ग्रामस्थांनी शेळके यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
ओझर्डे गावात सव्वादोन कोटींची विकास कामे
ओझर्डे गावाला आमदार शेळके यांनी सुमारे सव्वादोन कोटी रुपयांचा निधी दिल्याचे धनंजय ओझरकर यांनी सांगितले. या व्यतिरिक्त खडी आणि दोन लाख रुपयांची वैयक्तिक मदत केली. सुनीलअण्णांमुळे गावाच्या विकासाला गती मिळाली, असे ते म्हणाले.ओझर्डे गावात संदीप शेळके, भरत भोपे, विष्णू मुऱ्हे आदी पदाधिकारीही उपस्थित होते.
मावळच्या विकासाचे मॉडेल जगासाठी पथदर्शक
बौर गावात बाळू मोहोळ म्हणाले की,”मावळच्या विकासाचे मॉडेल संपूर्ण जगासाठी पथदर्शक आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्वसामान्य माणूस आमदारांच्या मागे आहे. त्यामुळे ते नक्कीच बहुमताने निवडून येतील हा विश्वास आहे. त्यासाठी सर्वांनी एक नंबरचे बटन दाबून त्यांना निवडून आणावे.“
संदीप खिरिड म्हणले की,”बौर गावाला मोठा विकास निधी दिल्याबद्दल मी आमदारांचे आभार मानतो, बौर गावातील तरुणांना न्याय फक्त तुम्हीच देऊ शकता, हीच आशा आहे म्हणून तुम्हाला आमचा पाठिंबा आहे”
राऊतवाडीत १० कोटींचा विकास निधी
राऊतवाडीतही आमदार शेळके यांचे जोरदार स्वागत झाले. त्यावेळी माजी सरपंच पोपटराव राऊत तसेच नामदेव राऊत, काळुराम राऊत, सोपान करके, भगवान लगड, शंकर लगड, आदेश लगड आदी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती. गावातील विकासकामांसाठी आमदारांनी १० कोटी रुपयांचा निधी दिला. २० लाख रुपये देऊन गावातील मंदिराचे काम पूर्ण केले. आमदारांनी कोणताही भेदभाव न करता सर्वांना मदत केली आहे,” असे आदेश लगड म्हणाले.
सुनील शेळके म्हणजे विकासाचा महामेरू
कडधे येथे आमदार शेळके यांच्या स्वागतासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले होते. गावच्या विकासाला आमदार शेळके यांनी ३४ कोेटी रुपयांचा निधी दिल्याचे माजी सरपंच काळू तुपे यांनी सांगितले. गावात पूर्वी रस्ते नव्हते. ते काम सुनील शेळके यांनी करून दिले. ते विकासाचा महामेरू आहेत, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. विरोधकांच्या दमदाटीला कोणीही घाबरू नका, आपल्या मागे सुनीलअण्णा सारखा देवमाणूस उभा आहे,असे ते म्हणाले.
सुनील शेळके म्हणाले, “आमदाराचं एकच काम म्हणजे असतं जनतेची कामे करणे. स्वतःचे घर न भरता जनतेच्या मागण्या पूर्ण करणे हे महत्त्वाचे आहे. या निवडणुकीच्या काळात जिथे कोण कोणाचे आहे, हे कळत नाही. तिथे तुमच्यासारखी मायबाप जनता माझ्यामागे ठामपणे उभी आहे,हेच माझ्यासाठी सर्व काही आहे “
कडधे येथे सरपंच हरिश्चंद्र तुपे, उपसरपंच बजरंग तुपे, माजी सरपंच हिराबाई तुपे, ग्रामपंचायत सदस्य गंगाबाई तुपे, गोरख खराडे आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
शेवती वसाहत येथील जंगी स्वागताने भारावून गेले सुनीलअण्णा
शेवती वसाहत येथील उत्स्फूर्त स्वागताने सुनीलअण्णा भारावून गेले. “असं जंगी स्वागत बघून मला येथे काहीच बोलायचे गरज नाही असंच वाटतेय, असे आमदार शेळके म्हणाले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शेवती वसाहत अध्यक्ष वैशाली कालेकर म्हणाल्या की, शेवती वसाहत येथे आमदार शेळके यांनी तीन कोटींपेक्षा जास्तीची कामे केली आहेत. रस्ते, सभा मंडप, गटारीची कामं एक महिन्यात झाली, मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली. आरी वर्कचे क्लास चालू केले, शिवण क्लासमुळे महिलांना आर्थिक फायदा झाला आहे. चष्मा वाटप सुद्धा केले आहे, पाणीसुविधा उपलब्ध करून दिली, मुलांना मोफत सायकल दिल्या.
यावेळी सुरेश कालेकर, सुनील केरू कालेकर, अंकुश गायकवाड, तुकाराम कालेकर, मारुती कालेकर, विमल कालेकर, लक्ष्मण कालेकर, सोपान कालेकर, विलास शेख, सुलतान शेख, समीर शेख, अल्ताफ शेख, गुलाब कालेकर, प्रकाश कालेकर, सुधीर कालेकर, पूजा कालेकर, सुवर्णा राऊत, बाळू मोरे, काशिनाथ अढाव, भरत कालेकर, अक्षय कालेकर आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवनानगरमध्ये जल्लोषात स्वागत
पवना नगर येथे क्रेनच्या आधारे घड्याळाचे मोठे चिन्ह कार्यक्रम स्थळी लावण्यात आले होते. अतुल कालेकर, अंकुश शेडगे, मंगेश कालेकर यांच्यासह ग्रामस्थ, तरुण कार्यकर्ते व महिला भगिनींनी आमदार शेळके यांचे जोरदार स्वागत केले. अण्णा का एवढा प्रसिद्ध आहे हे कधीच कळले नाही, पण आज एवढी गर्दी बघून मला समजलं की अण्णा सच्चा आहे म्हणून तो टिकून आहे आणि राहील, अशा भावना एका तरुण कार्यकर्त्यानी व्यक्त केल्या.
सुनील शेळके म्हणाले की, सुनील शेळके हा भावकीसाठी नाही तर गावकीसाठी आहे. तुमच्या अपेक्षा मी पूर्णच करत आलोय आणि यापुढेही करत राहीन.“ ‘सुनील अण्णा आमचा एक नंबर,’ या गाण्याच्या तालावर तरुणाईने एकच जल्लोष करत आमदार शेळके यांना शुभेच्छा दिल्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महायुतीचा धर्म पाळणार, शेळकेंना विजयी करणार ! सुनिल शेळके यांच्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते एकवटले
– …तर विरोधकांवर धमक्यांचे फोन करण्याची वेळच येणार नाही – आमदार सुनिल शेळके
– लोणावळा ग्रामीण पोलिसांचा पवनानगर, तिकोनापेठ येथे रुट मार्च । Lonavala Police