रविवारी (20 नोव्हेंबर) रोजी कार्तिकी एकादशी (उत्पत्ती एकादशी) अर्थात आळंदी यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक, वारकरी बंधू-भगिनी श्री क्षेत्र आळंदी येथे आले होते. पेण येथील काही भाविक देखील माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला गेले होते. मात्र, आळंदीहून परतत असताना त्यांच्या एसटी बसचा मुंबई-पुणे महामार्गावर अंडा पॉइंटजवळ अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कुणीही गंभीर जखमी झाले नाही. तसेच कोणतीही जिवितहानी झालेली नाही.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर घटनेची माहिती मिळताच मदत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेतून खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. जुन्या मुंबई पुणे हायवेवर अंडा पॉईंट जवळ या भाविकांच्या एसटीचा अपघात झाला होता. उपचारानंतर या सर्वांना पुढील प्रवासासाठी एमएसआरटीसीचे कर्जत डेपो मॅनेजर शंकर यादव यांनी संपूर्ण व्यवस्था करून पुढे पाठवण्यास मदत केली.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! एकविरा देवीचं दर्शन घेऊन निघालेल्या शिक्षकांच्या बसचा मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात अपघात
– “छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींना तात्काळ हटवा !”