मावळ तालुक्यातील अनेक गावांत महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणाऱ्या तळेगाव दाभाडे येथील हॅन्ड इन हॅन्ड संस्थेमार्फत कार्ला गावांत एक स्तुत्य उपक्रमांचा शुभारंभ गुरुवार (दिनांक 30 मार्च) रोजी करण्यात आला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्था तळेगाव दाभाडे आणि बेलस्टार मायक्रो फायनान्स यांच्या मदतीने मावळमधील कार्ला गावातील महिलांच्या एका ग्रुपने पनीर निर्मितीचा व्यवसाय सुरु केला आहे. दिनांक 30 मार्च 2023 रोजी या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला. मावळ तालुक्यात एकूण 24 गावांत असे प्रकल्प राबवण्यात येणार आहे. ( Start of Paneer manufacturing business through women group in Karla village One step in economic empowerment of women )
गावातील विविध महिला बचत गटाच्या सदस्य यांनी एकत्र येऊन पनीर व्यवसायिक ग्रुप तयार केला. व्यवसाय करण्या करिता खवा आणि पनीर बनिवण्याची मशीन घेण्याकरिता हॅन्ड इ हॅन्ड संस्था आणि बेलस्टार मायक्रो फायनान्स मार्फत आर्थिक सहाय्य करण्यात आले.
सदर व्यवसाय उद्घाटन कार्यक्रमाला बेलस्टार मायक्रो फायनान्स च्या वतीने महादेव ताकमोघे, कार्ला गावच्या सरपंच दिपाली दिपक हुलावळे, तत्सम पनीर उद्योग गटांचे सदस्य उपस्थित होते. सदर उद्घाटन कार्यक्रमाला हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेमार्फत अनिल पिसाळ, सारिका शिंदे आणि पंढरीनाथ बालगुडे इत्यादी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– राम जन्मला गं सखे..! मावळ तालुक्यातील प्रभाचीवाडी येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात जन्मोत्सव सोहळा थाटामाटात साजरा । Ram Navami 2023
– तळेगावात कोयता गँगची दहशत; ‘मोबाईलचे हप्ते भरणार नाही, काय करायचे ते कर’ म्हणत एकावर जीवघेणा हल्ला, 3 आरोपी अटकेत