राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत शनिवारी (29 जुलै) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीनंतर संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय) यांनी सोमवारी पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. या बैठकीत शेतीमालाला हमीभाव देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून त्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठण करून त्यामार्फत केंद्र सरकारकडे स्वतंत्र प्रस्ताव पाठवण्यात येईल, अशी माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. ( State Agricultural Price Commission Will Soon said Agriculture Minister Dhananjay Munde )
सदर बैठकीमध्ये संयुक्त किसान मोर्चा अराजकीय बळीराजा शेतकरी संघटना तसेच ऊसतोड कामगार व वाहतूकदार संघटनेच्या वतीने मांडण्यात आलेल्या विविध मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर सोमवारपासून पुकारण्यात आलेले आंदोलन मागे घेतल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.
- नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदानाची रक्कम वितरित करण्यासाठी सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये आर्थिक तरतूद करण्यात आलेली असून लवकरच हे अनुदान वितरित करण्यात येईल. ऊर्जा, महसूल, पशु संवर्धन, सामाजिक न्याय आदी विभागांशी निगडित मागण्यांच्या संदर्भात संबंधित विभागांशी लवकरच स्वतंत्र बैठका घेऊन त्या मागण्यांवरही सकारात्मक निर्णय घेतले जातील. ऊसतोड कामगारांबरोबरच वाहतूकदार यांचा लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळामध्ये समावेश करणे, तसेच त्यांच्या विविध मागण्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे या संदर्भात विशेष सहाय्य विभागाशी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन तेही निर्णय घेतले जातील, अशीही माहिती मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.
संयुक्त किसान मोर्चा (अराजकीय), बळीराजा शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटना आदींच्या विविध मागण्यांसंदर्भात आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली.
सी-2, 50% या आधारे शेतीमालाला हमीभाव देण्यासंदर्भात राज्य कृषी मूल्य आयोगाचे लवकरात लवकर… pic.twitter.com/aK8z1neaWo
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 29, 2023
सदर बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव परिमल सिंह, उपसचिव संतोष कराड तसेच संघटनेचे राजू पाटील , संदीप गिड्डे पाटील यांसह पदाधिकारी उपस्थित होते. हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याचे संघटनेच्या वतीने संदीप गिड्डे पाटील यांनी जाहीर केले तसेच सरकारने दाखवलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल आभार व्यक्त केले. ( State Agricultural Price Commission will soon be constituted to ensure guaranteed prices for agricultural produce said Agriculture Minister Dhananjay Munde )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतकडून संपूर्ण शहरात निर्जंतुकीकरण फवारणी – नगराध्यक्ष मयूर ढोरे
– पवना बंदिस्त जलवाहिनीचे काम सुरु करा, भाजपच्या आमदाराची विधानसभेत मागणी, वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता!
– सत्तेत गेल्यावर आमदार सुनिल शेळकेंनी मावळसाठी आणला तब्बल 39 कोटींचा निधी; पाहा होणाऱ्या कामांची यादी