महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या मान्यतेने आणि रमेशकुमार सहानी इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या संयोजनाने कै. नारायण (आण्णा) सदगुरु ढोरे यांच्या स्मरणार्थ भव्य राज्यस्तरीय बेंचप्रेस ( अनईक्विप्ड/ ईक्विप्ड )स्पर्धा 2023 वडगाव मावळ इथे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 26 ऑगस्ट आणि रविवारी दिनांक 27 ऑगस्ट 2023 अशा दोन दिवस ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेचे उदघाटन शनिवारी सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे. ( State level bench press competition from Saturday in Vadgaon Maval city )
महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या मान्यतेने व रमेशकुमार सहानी इंग्लिश मीडियम स्कूलच्या संयोजनाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती रमेशकुमार सहानी स्कूलचे अध्यक्ष राजेंद्र म्हाळसकर यांनी दैनिक मावळला दिली. रमेशकुमार साहनी स्कूलचे माजी उपाध्यक्ष नारायण सदगुरू ढोरे यांच्या स्मरणार्थ भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात ही राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहेत.
शनिवारी (दिनांक 26 ऑगस्ट) सदर स्पर्धेचे उद्घाटन सकाळी ठिक दहा होईल. यावेळी उद्योजक रामदास काकडे, आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर श्यामराव अकोलकर, उद्योजक सुशीलकुमार सहानी, कर्नल शोएब उल्लाखान आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. वडगावचे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, संतोष खांडगे, सुभाष जाधव, बाळासाहेब ढोरे आदी मान्यवरही यावेळी उपस्थित राहणार आहेत. ( State level bench press competition from Saturday in Vadgaon Maval city )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक निर्णय घेईल – अदिती तटकरे; वाचा काय आहेत मागण्या?
– महागाव ग्रामपंचायतीमध्ये 35 ठिकाणी सौर पथदिवे; आता रात्री वीज गेल्यावरही गावात असणार प्रकाश
– बाफना डीएड कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना अध्यापनाचे प्रशिक्षण; इनरव्हील क्लबचा उपक्रम