वडगाव मावळ येथील प्रसिद्ध व्याख्याते तथा यशदा संस्थेतील प्रशिक्षक विवेक गुरव यांना राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. कोल्हापूर येथे झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात भारतीय इस्रो संशोधन केंद्राचे माजी सेवानिवृत्त अभियंता आणि सध्याचे प्रमुख नगीनभाई प्रजापती यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अविष्कार ॲड एज्युकेशन फाउंडेशन संस्था भारत या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोल्हापूरमधील शाहू स्मारक भवन येथे पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रसिद्ध वक्ते विवेक गुरव यांच्यासह महानराष्ट्र डेव्हलपमेंट संस्थेचे अध्यक्ष कमलेश राक्षे यांनाही हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी जेष्ठ साहित्यिक लेखक प्रा किसनराव कुऱ्हाडे, उपप्राचार्य नेस वाडीया पुणे श्री प्रकाश चौधरी, रयत शिक्षण संस्था दक्षिण विभाग अध्यक्ष ए बी शेख अविष्कार सोशल ॲड एज्युकेशन संस्था भारतचे अध्यक्ष संजय पवार (पत्रकार) हे उपस्थित होते. ( State level Lokraja Rajarshi Shahu Maharaj Award to Vivek Gurav from Vadgaon Maval )
अधिक वाचा –
– लोणावळ्यातील दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क ! थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून नवे आदेश जारी, पर्यटनाबाबत सविस्तर नियमावली जाहीर
– भुशी डॅम दुर्घटना : रेस्कू ऑपरेशन पूर्ण, पाचही शव शोधण्यात आपदा मित्रांना यश, प्रतिकुल परिस्थितीत केलं शोधकार्य
– कार्ला – मळवली मार्गावरील इंद्रायणी नदीवरील पर्यायी पुल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचे दळणवळण थांबले । Karla News