Dainik Maval News : तळेगाव ते ओवळे मार्गावरील एसटी बसबाबत तहसीलदार मावळ, तळेगाव दाभाडे आगार प्रमुख आणि शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन यांना विद्यार्थी आणि प्रवाशांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. भाजपाचे बाळासाहेब घोटकुले यांनी याबाबत पुढाकार घेवून ओवळे येथे जाणाऱ्या बसच्या फेऱ्या, मुक्कामी एसटी बस सुरू करणे, सुटीच्या दिवशी बस पाठविणे आदी विषयांबाबत निवेदन दिले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, दत्तात्रेय माळी, सरपंच ऋषिकेश कारके, तुषार साठे, रामभाऊ गोपाळे यांसह विद्यार्थी, प्रवासी यावेळी उपस्थित होते. एसटी आगार प्रमुखांनी प्रवाश्यांच्या मागण्यांवर आठ दिवसांमध्ये कार्यवाही केली नाही तर एसटी आगारामधून एकही बस बाहेर पडून देणार नाही, असा इशारा बाळासाहेब घोटकुले यांनी दिला आहे.
प्रमुख अडचणी आणि मागण्या
1. ओवळे ते तळेगाव एसटी वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
2. रविवार आणि सुटीच्या दिवशी तळेगाव डेपोतून येणारी बस बंद करण्यात येते. यामुळे आठवडे बाजारासाठी आणि रुग्णालयात जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होते.
3. ओवळे येथे कायमस्वरुपी मुक्कामी एसटी बस सुरू करावी.
4. सुटीच्या दिवसातही बसची फेरी कायम ठेवावी.
5. सुस्थितीत असणारी बस तळेगाव ते ओवळे मार्गावर पाठवावी.
6. दुपारी एक वाजताची बेबडओहोळ एसटी वेळेवर सोडावी, जेणेकरून सोमाटणे, परंदवडी, बेबडओहोळ, पिंपळखुटे, शिवणे येथील मुले या एसटीने जातील.
ओवळे ते तळेगाव एसटी वेळेवर येत नसल्यामुळे शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वेळेत न पोचल्यामुळे नुकसान होते. आसन मर्यादा 50 ते 55 एवढी असताना 130 ते 135 प्रवासी असतात. गर्दीमुळे अनेक विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश मिळत नाही. मुली व महिलांना गर्दीत प्रवास करावा लागत असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असल्यामुळे काही अनर्थ घटना घडण्याची ठाक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, येत्या आठ दिवसांमध्ये मागण्यांबाबत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा व एसटी आगारमधून एकही एसटी बाहेर पडून देणार नाही, असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.
अधिक वाचा –
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke
– आमदार सुनिल शेळके यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद । Maval News
– सरकारने पुढाकार घेऊन मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवावे ; अखंड मराठा समाज मावळ यांचे तहसीलदारांना निवेदन