Dainik Maval News : कान्हे उपजिल्हा रूग्णालय व ट्रॉमा केअर युनिटला स्वर्गीय आमदार रघुनाथदादा सातकर यांचे नाव देण्याबाबत मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाच्या वतीने आमदार सुनिल शेळके यांना निवेदन देण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कान्हे ( ता. मावळ) येथे भव्य असे कान्हे उपजिल्हा रूग्णालय व ट्रामा केअर युनिट उभारले असून सदर रूग्णालयाचे उद्घाटन व लोकार्पण थोड्याच दिवसांमध्ये होणार आहे. सदरच्या उपजिल्हा रूग्णालयाला मावळ तालुक्याचे भूषण, माजी आमदार, स्वर्गीय रघूनाथदादा सातकर यांचे नाव देण्यात यावे व रूग्णालयाच्या आवारात त्यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात यावा असा जाहीर ठराव मंडळाच्या मासिक बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.
तसेच या मागणीचे निवेदन मावळ चे आमदार सुनिल शेळके यांचेकडे मंडळाच्या वतीने करण्यात आली. यावेळी हे निवेदन देताना मंडळाचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. नंदकुमार महाराज भसे, उपाध्यक्ष दिलीप वावरे, बजरंग घारे, दीपक रावजी वारिंगे यांसह मंडळाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
मावळ तालुका वारकरी सांप्रदाय मंडळाची मासिक बैठक रविवारी (दि.15) मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यावेळी मंडळाचे सर्व कार्यकारिणी पदाधिकारी, विभाग प्रमुख, विभागीय अध्यक्ष व ग्रामप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
स्व. आमदार रघूनाथदादा सातकर यांनी मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासात आपले अतुलनीय योगदान दिले आहे. तसेच सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक, वारकरी सांप्रदाय क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. मावळ तालुक्याचे आमदारपद, सभापती, सरपंच अशी महत्वाची पदे त्यांनी भूषविली असून अनेक विकासकामे तडीस नेली आहेत.
अधिक वाचा –
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke
– आमदार सुनिल शेळके यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद । Maval News
– सरकारने पुढाकार घेऊन मनोज जरांगे यांचे उपोषण सोडवावे ; अखंड मराठा समाज मावळ यांचे तहसीलदारांना निवेदन