Dainik Maval News : वडगाव नगरपंचायतीच्या आरोग्य विभागामार्फत अॅनिमल बर्थ कंट्रोल (डॉग्ज) नियम 2013 अंतर्गत नगरपंचायत हद्दीतील मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मुख्याधिकारी डाॅ प्रविण निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने ही मोहीम सुरु केली आहे.
मंगळवार (दि.4) पासून शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधून मोहिमेची सुरुवात झाली. यात भटक्या मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करणे ,शस्त्रक्रीया केली जाणार आहे. प्रभागातील सर्व पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी पाळीव कुत्र्यांची ओळख पटण्याकरिता कुत्र्यांच्या गळ्यात पट्टा घालावा, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे.
नगर पंचायत आरोग्य विभागाचे नागरिकांना आवाहन :
“वडगाव नगरपंचायत हद्दीतील सर्व श्वान मालकांना आवाहन करणेत येते की, नगरपंचायत मार्फत अॅनिमल बर्थ कंट्रोल (डॉग्ज) नियम 2013 अंतर्गत नगरपंचायत परिक्षेत्रातील मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करणे, शस्त्रक्रीया उपरांत प्रथमोपचारिक काळजी घेणे व त्यांना जेथून पकडले तेथे पुर्ववत त्याच ठिकाणी सदरहू सोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तरी शहरातील सर्व पाळीव कुत्र्यांच्या मालकांनी पाळीव कुत्र्याची ओळख पटणे करिता आपल्या कुत्र्यांच्या गळ्यात पट्टा घालावा अन्यथा नगरपंचायत मार्फत पाळीव कुत्र्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली, तर त्यास नगरपंचायत जबाबदार असणार नाही,” असे आवाहन वडगांव नगरपंचायत चे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ प्रवीण निकम यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आम्हाला पैसे नको ! लाडक्या बहिणींना अर्ज पडताळणीची धास्ती, योजनेचा लाभ नको म्हणत ‘इतक्या’ बहिणींची माघार । Ladki Bahin Yojana
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्याकडून कारवायांचा धडाका ! अंमली पदार्थ, गांजा विक्री व बेकायदा जुगार खेळणाऱ्यांवर गुन्हे दाखल
– बोरघाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाला ‘वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर’ यांचे नाव देण्याची मागणी । Mumbai Pune Missing Link