पवन मावळ विभागातील पवना धरण जलाशयात बुडून एका 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना आज (दि. 23 जून) घडली आहे. पुण्यातील विमानगर भागातील सिम्बायोसिस कॉलेजची 6 मुले मावळ तालुक्यात पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आली होती. रविवारी सायंकाळी फांगणे येथे पवना धरणाच्या जलाशयात जलविहारासाठी ते उतरले असता त्यांच्यातील एकाचा बुडून मृत्यू झाला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अद्वेत सुदेश वर्मा (वय 18 वर्ष, रा. विमान नगर, पुणे मूळ रा. मयूर विहार, पूर्व दिल्ली) असे बुडून मृत पावलेल्या तरूणाचे नाव आहे. तो पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेज BBA Simbosis college Viman nagar Pune येथे शिकत होता. रविवार असल्याने अद्वेत आणि त्याचे अन्य 5 मित्र असे सहाजण पवना धरण परिसरात पर्यटनासाठी आले होते. साधारण 5 वाजता फांगणे (ता. मावळ) येथे पवना धरणाच्या पाण्यात ते उतरले, परंतू पाण्याचा अंदाज न आल्याने अद्वेत वर्मा बुडाला. ( student of Symbiosis College in Pune who came for tourism drowned in Pavana Dam Maval )
घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तिथे धाव घेतली. त्याचबरोबर शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा यांनाही पाचारण करण्यात आले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने तरूणाचा शोध सुरू करण्यात आला. अखेर रात्री उशीरा आठ वाजताच्या सुमारास त्याचे शव हाती लागले. मृत अद्वेत वर्मा याच्या कुटुंबीयांना दुर्घटनेबाबत कळवण्यात आले आहे, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक किशोर धुमाळ यांनी दिली.
अधिक वाचा –
– कार्ला – भाजे लेणी, देहूरोड कॅन्टोन्मेंट, आयएनएस शिवाजी आदी ठिकाणी कैवल्यधाम योग संस्थेमार्फत योग प्रशिक्षण शिबिर
– ‘स्पंदन’ आणि ‘खुशी के रंग’ फाउंडेशनच्या माध्यमातून महागाव, सावंतवाडी, मालेवाडी येथील गरजू विद्यार्थ्यांना स्कूल कीटचे वाटप
– मावळ तालुक्यात 19 गावे दरडींच्या छायेत ! ‘ही’ 8 गावे संवेदनशील म्हणून घोषित, पुनर्वसन कधी होणार ? । Maval News