Dainik Maval News : २०४७ साली भारत देश महासत्ता बनवण्याची जबाबदारी आजच्या विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळे त्यांनी आत्तापासून कामाला लागले पाहिजे व त्यानुसार क्षेत्र निवडून आपले करीअर बनवावे, असे मत पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार भगवान साळुंखे यांनी तळेगाव येथे व्यक्त केले.
- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मावळ, कै. ॲड. कु. शलाका संतोष खांडगे चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने शालांत प्रमाणपत्र परिक्षा २०२५ मध्ये तालुक्यातील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व शंभर टक्के निकाल लागलेल्या मुख्याध्यापकांच्या सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता, यावेळी साळुंखे बोलत होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभग संघटनमंत्री अभंग सर, पुणे जिल्हा कार्यवाह महेश शेलार, रोटरी ३१३१ चे प्रांतपाल विन्सेंट सालेर, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी अध्यक्ष प्रविण भोसले, सचिव संदिप मगर, उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे, डोळसनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मिलिंद शेलार, शिक्षण विस्तार अधिकारी मनिषा दहितुले, शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष राम कदमबांडे, कार्यवाह देवराम पारीठे, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब खोसे, जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मण मखर,माजी मुख्याध्यापक बबनराव भसे, सल्लागार विलास भेगडे, स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मुख्याध्यापक रेणू शर्मा यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- पुढे बोलताना साळुंखे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे त्यासाठी पालक व शिक्षकांनी मार्गदर्शक म्हणून काम करावे . यावेळी मिलिंद शेलार म्हणाले की, दहावीचा महत्वाचा टप्पा विद्यार्थ्यांनी पार केला असून पुढील आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे. यावेळी संदिप मगर, विलास भेगडे,महेश शेलार यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी मावळ तालुक्यातील ६५ माध्यमिक शाळांतील प्रथम क्रमांक विद्यार्थी आणि ३० शाळांचे शंभर टक्के निकाल लागलेल्या मुख्याध्यापकांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम कदमबांडे यांनी, सुत्रसंचालन भारत काळे व वैशाली कोयते यांनी केले. तर आभार प्रविण भोसले यांनी मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे दरम्यानचा ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– अत्यंत आनंदाची बातमी! किल्ले लोहगडासह ‘या’ १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश ; शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
– कौतुकास्पद! टाकवे गावातील रिक्षा चालकाचा मुलगा बनला सनदी लेखापाल (सीए), आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना