लोणावळा शहराजवळ एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केलेल्या गुन्ह्यातील आरोपीने शुक्रवारी (दि. 29 सप्टेंबर) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विजय शशिकांत मालपोटे (वय 35 रा. उर्से, मावळ) असे गळफास घेतलेल्या सदर आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास शिरगाव इथे हा प्रकार समोर आला. याप्रकरणी शिरगाव पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी सदर आरोपीने अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेने संपूर्ण मावळ तालुका हादरला होता. त्यानंतर लोणावळा ग्रामीण ठाण्यात महिला वर्गासह अनेक पक्षाच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी आरोपीला पकडून कठोर शिक्षेची आणि केस फास्ट ट्रॅकवर चालवण्याची मागणी केली होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
गुन्हा घडल्याच्या आणि पोलिसांत दाखल झालेच्या दिवसापासून हा आरोपी फरार होता. त्यानंतर त्याच्या शोधात पोलिस होते, परंतू शुक्रवारी त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक बळवंत गवित, प्रकाश पारखे, पोलीस अंमलदार समाधान फडतरे यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. शिरगाव पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– आजपासून पितृपक्षाचा प्रारंभ! पितृपक्षात श्राद्ध का करावे? श्राद्धाच्या तिथी आणि पद्धती, जाणून घ्या सर्वकाही
– राष्ट्रवादीच्या ओबीसी विभाग पुणे जिल्हाध्यक्षपदी वडगाव मावळ येथील अतुल राऊत यांची निवड; शरद पवारांच्या हस्ते नियुक्तीपत्र
– तळेगावच्या प्रथमेशने सातासमुद्रापार जपली भारतीय संस्कृती; सहकाऱ्यांसोबत थाटामाटात साजरा केला गणेशोत्सव