सोमाटणे टोलनाका हटाव कृती समिती मावळ च्या वतीने उद्या म्हणजेच गुरुवार रोजी (9 मार्च) सोमाटणे टोलनाका हटवा या मागणीसाठी संपूर्ण तळेगाव दाभाडे शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच सोमाटणे बंदची देखील हाक देण्यात आली आहे.
मुदत संपून देखील अनेक वर्षांपासून सोमाटणे टोलनाका इथे अनधिकृतरित्या टोल वसूली होत असून हा टोलनाका बंदच व्हावा, अशी मागणी कृती समितीने केली आहे. यासाठी दिनांक 9 मार्च रोजी तळेगाव दाभाडे शहर बंदची हाक देण्यात आली असून त्यानंतर काही दिवसात टोलनाक्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. ( Talegaon Dabhade City Bandh Movement To Demand Closure Somatne Toll Plaza )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नेमकी मागणी काय?
1) दररोज होणारे ट्राफिक
2) दररोज होणारी आरेरावी
3) स्थानिक रहिवासी लोकांना टोल न घेण्याचा ठराव असूनही मनमानी कारभार
4) सोमाटणे टोलनाका Documently कोणतीच कागदपत्रे नसताना टोल सुरू आहे
5) ठराव असूनही सोमाटणे गावातील रहिवाशांना विशेषताः (सोसायटीतील रहिवाशी) लोकांकडून टोल वसूल करणे
या विरोधात उद्या दिनांक 9 मार्च 2023 रोजी सोमाटणे गावातील लोकांनी आणि व्यापारी वर्गानी सोमाटणे बंद ला प्रतिसाद देवुन सहकार्य करावे, तसेच तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांना आणि व्यापारी वर्गाने तळेगाव बंदला प्रतिसाद द्यावी, अशी हाक देण्यात आली आहे.
अधिक वाचा –
– महिला दिन विशेष – मावळची ‘सुवर्ण कन्या’ तृप्ती शामराव निंबळे, शेतकऱ्याची पोरगी चॅम्पियन बनली अन् तालुक्याची मान अभिमानाने उंचावली
– तुकाराम बीज सोहळ्यासाठी पवनमावळ भागातून दिंडीचे प्रस्थान, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष करत वारकरी देहूच्या दिशेने मार्गस्थ