Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चा निकाल समोर आला असून यंदाच्या निवडणुकीत मोठा बदल पाहायला मिळत आहे. यंदा पालिकेत 28 जागांचे निकाल पाहता सर्वाधिक 21 नगरसेवक हे प्रथमच पालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.
तळेगाव नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजपा यांच्या युतीला निर्विवाद बहुमत मिळाले असून 14 प्रभागांतून 28 नगरसेवक निवडून आले आहेत. 28 नगरसेवकामध्ये 21 नगरसेवक हे प्रथमच निवडून आले आहेत, अर्थात प्रथमच नगरसेवक झाले आहेत, तर केवळ 7 नगरसेवक हे माजी किंवा यापूर्वी नगरसेवक होते.
पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 17 जागा असून एक अपक्ष उमेदवार देखील राष्ट्रवादी पुरस्कृत असून 10 जागांवर भाजपाचे नगरसेवक आहेत. दरम्यान एकूण 28 जागांपैकी 19 जागांवर बिनविरोध नगरसेवक निवडून आले होते, तर केवळ 9 जागांसाठी प्रत्यक्ष निवडणूक झाली.
यंदाच्या निवडणुकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनेक प्रस्थापित राजकीय कुटुंबांचे प्रतिनिधी सभागृहात दिसून येत आहेत. यात दाभाडे आडनावाचे नगराध्यक्ष असून दाभाडे आडनावाचे दोन नगरसेवक आहेत, भेगडे आडनावाचे पाच नगरसेवक, शेळके आणि खांडगे आडनावाचे प्रत्येकी तीन नगरसेवक, तर खळदे आणि भगत आडनावाचे प्रत्येकी दोन नगरसेवक निवडून आले आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– वडगाव, लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस, तर तळेगाव दाभाडे शहरात भाजपाचा नगराध्यक्ष ; तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक
– पतीचा पराभव, पण पत्नीचा विजय ; कुठे १ मताने तर कुठे २ मताने उमेदवार विजयी ! मावळातील वडगाव नगरपंचायतीचा निकाल ठरला लक्षवेधी
– Dehu : देहू-येलवाडी रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी, लवकरच होणार काँक्रीटीकरण ; ‘पीएमआरडीए’कडून कार्यारंभ आदेश

