तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत सध्या सुरु असलेल्या भोंगळ कारभारावरुन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि स्थानिक नेते यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा बट्ट्याबोळ करुन जनतेला वेठीस धरणारे आज घरात बसलेत. त्यांनी तळेगावच्या जनतेला उत्तर द्यावं,’ असा थेट ‘बाण’ आमदार सुनिल शेळके यांनी सोडला आहे. मागील काही महिन्यांपासून तळेगाव नगरपरिषदेच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. मागील सहा महिन्यांपासून शहरातील कचरा, स्वच्छता, पाणी पुरवठ्यावरुन नागरिक त्रस्त झाल्याचे दिसत आहेत. ( Talegaon Dabhade Municipal Council CEO N K Patil MLA Sunil Shelke MP Shrirang Barne Politics )
“सध्याचे मुख्याधिकारी एन.के.पाटील यांच्यावर कार्यपद्धतीवर नागरिकांची तीव्र नाराजी असून मुख्याधिकाऱ्यांना मात्र जनतेच्या मुलभुत प्रश्नांविषयी कुठलेही गांभीर्य नसल्याचे चित्र दिसत आहे. माजी मुख्याधिकारी विजय सरनाईक यांचा एक वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. अजून दोन वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असताना काहींनी स्वतःसाठी आणलेला अकार्यक्षम मुख्याधिकारी तळेगाव शहरातील कचरा, रस्ता, पाणी असा एकही प्रश्न सोडवू शकला नाही. त्यांना फक्त टक्केवारीत रस आहे का?” असा सवाल आमदार सुनिल शेळके यांनी केला.
“मागील तीन वर्षात शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला. निधी उपलब्ध असलेल्या रस्त्यांची कामे जाणीवपूर्वक बंद ठेवली आहेत. नगरपरिषदेच्या नवीन इमारतीचे बिल ठेकेदाराला दिले जात नाही. मुख्याधिकाऱ्यांकडून कुठलाही पाठपुरावा केला जात नाही. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर अनेक मुख्याधिकारी आले, प्रशासक आले. विजय सरनाईक यांच्यासारख्या चांगल्या अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक राजकारण करुन एन. के. पाटील सारख्या भ्रष्ट मुख्याधिकाऱ्याला नगरपरिषदेत कुणी आणले. ज्यांनी असा अकार्यक्षम मुख्याधिकारी शहरात आणला ते खासदार श्रीरंग बारणे आणि ज्यांच्या सांगण्यावरून आणला ते स्थानिक नेते तळेगाव शहराच्या सध्याच्या परिस्थितीची जबाबदारी न घेता घरात बसलेत,” असा आरोप आमदार सुनिल शेळके यांनी केला आहे.
“आमच्या समस्यांकडे आमदारांनी लक्ष द्यावे, अशी सुचना शहरातील नागरिकांनी केली होती. त्यांच्या सुचनेचा आदर करतो. सध्या संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जात नाही. नगरपरिषदेकडे कर भरुन देखील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. मी स्वतः मागील दहा महिन्यांपासून नगरपरिषदेत पाऊल ठेवले नाही. शहरातील असे गलिच्छ राजकारण थांबवण्यासाठी जनतेनी देखील साथ देणे गरजेचे आहे,” असे मत आमदार सुनिल शेळके यांनी प्रसिद्धी पत्रकात मांडले आहे आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– महाराष्ट्रातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणूका जाहीर! 5 नोव्हेंबरला होणार मतदान, वाचा सविस्तर
– सिनेक्रॉन कंपनीच्या व्यवस्थापिका मेयांग आणि अँटोनिया मेनेटा यांचे वडगावात खास मराठमोळ्या पद्धतीने स्वागत
– दिवाळीला मैदा आणि पोह्यांसह मिळणार ‘आनंदाचा शिधा’, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील 5 मोठे निर्णय, लगेच वाचा