Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चा निकाल जाहीर झाला असून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे संतोष दाभाडे पाटील हे विजयी झाले आहेत, तर नगरसेवक पदाच्या एकूण 28 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या एकूण 17 जागा आलेल्या आहेत.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत नगरसेवक पदाच्या एकूण 28 जागा होत्या. त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे एकूण 17 नगरसेवक निवडून आले, तर एक निवडून आलेला अपक्ष नगरसेवक देखील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आहे, अशी चर्चा आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास 18 नगरसेवक निवडून आले असे म्हणू शकतो. तर भाजपाचे 10 नगरसेवक निवडून आले आहेत.
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीच्या रेसमध्ये एकूण तीन उमेदवार होते. त्यात युतीचे अर्थात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा युतीचे परंतु भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर संतोष दाभाडे पाटील हे निवडून आले आहेत. त्यांना 20,456 मते मिळाली असून एकूण 11,755 मतांची आघाडी घेऊन ते निवडून आले आहेत.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– अन्यथा दहा दिवसांनंतर सोमाटणे फाटा आणि वरसोली येथील टोलनाके बंद पाडणार ; आमदार सुनील शेळकेंचा इशारा
– जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम
– कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश
– वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime
