Dainik Maval News : लोकमान्य टिळकांनी उभारलेल्या तळेगाव दाभाडे येथील पैसा फंड काच कारखान्याच्या वास्तूची जमीन विक्री करण्याची परवानगी औद्योगिक निधी विश्वस्त संस्थेच्या विश्वस्तांना देऊ नये, अशी मागणी फुले-शाहू-आंबेडकर प्रतिष्ठानने जिल्हाधिकारी कार्यालयाद्वारे मुख्यमंत्री आणि सह धर्मदाय आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
1908 मध्ये लोकमान्य टिळक यांनी व अंताजी काळे यांनी स्वदेशीला चालना देण्यासाठी ६५ एकर जागा खरेदी करून तळेगाव दाभाडे येथे नवीन समर्थ विद्यालय आणि पैसा फंड काच कारखान्याची वास्तू उभी केली होती. त्यानंतर अस्तित्वात आलेले औद्योगिक निधी विश्वस्त मंडळाचे संचालक अनेक वेळा विविध कारणाखाली संस्था आर्थिक अडचणीत आहे, असे दाखवतात. तसेच सह धर्मदाय आयुक्त यांची दिशाभूल करून ६५ एकर जमिनीपैकी काही भूखंडाची संबंधितांना कमी किमतीत विक्री करण्याचा प्रयत्न करत आहे.
वास्तविक पाहता कारखान्याला रेल्वेच्या सिग्नलला लागणाऱ्या काचेची मागणी असताना देखील संस्था आर्थिक अडचणीत का येते? याचे गौडबंगाल आजपर्यंत नागरिकांना कळालेले नाही. जमिनीसह वास्तूला ऐतिहासिक महत्त्व असतानाही संस्थेच्या सध्याच्या संचालकांनी जमिनीची विक्री करण्यासाठी सह धर्मदाय आयुक्तांकडे परवानगी मागितली आहे.
यापूर्वी अनेक वेळा जमीन विकून आता पुन्हा ७ हजार ३४४ चौरस मीटर जमीन विकण्याचा प्रस्ताव वर्तमानपत्रात प्रसिद्ध केला आहे. या विक्रीस प्रतिष्ठानने विरोध करून जमिनीची विक्री करण्याची परवानगी विश्वस्तांना देऊ नये, तसेच टिळकांनी निर्माण केलेल्या ऐतिहासिक ठेव्याची जपणूक व्हावी, अशी मागणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर आणि सचिव जयंत कदम यांनी केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ग्लास स्काय वॉक प्रकल्पाबाबत विशेष बैठक संपन्न । Lonavala Glass Sky Walk
– अल्पवयीन मुली, महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी
– उर्से खिंडीत गणेशमूर्ती आढळल्याने खळबळ; संकलित केलेल्या मूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन न केल्याने नागरिकांचा संताप । Maval News
– अजित पवार यांच्या सूचनेनंतर चाकणमधील अतिक्रमणविरोधी कारवाईला वेग ; पीएमआरडीएकडून कारवाई सुरू । Chakan News