Dainik Maval News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्री आणि विभागांना शंभर दिवसांच्या कामगिरीचे लक्ष्य दिले होते. त्याच्या दुसऱ्या टप्यात पिंपरी -चिंचवड पोलीस आयुक्तालयातील २३ पोलीस ठाण्यांमधून तळेगाव दाभाडे आणि चिखली पोलीस ठाणी अव्वल ठरली आहेत. दोन्ही पोलीस ठाण्यांनी संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे.
याबद्दल पोलीस आयुक्त (सीपी) विनयकुमार चौबे यांनी अव्वल ठरलेल्या पोलीस ठाण्यांचे तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील प्रत्येकी दोन अशा सहा पोलीस ठाण्यांचे अभिनंदन केले आहे.
- उपक्रमात भोसरी आणि देहूरोड पोलीस ठाण्यांनी संयुक्तपणे दुसरा, तर दिघी आणि पिंपरी पोलीस ठाण्यांनी तिसरा नंबर पटकाविला आहे. स्वतः पोलीस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, उपायुक्त बापू बांगर (वाहतूक) यांनी पोलीस ठाण्यांना भेट देऊन त्यांची पाहणी केली होती, नंतर विजेते जाहीर केले.
पोलीस ठाण्यांमधील स्वच्छता, बेवारस वाहने आणि मुद्देमालाची विल्हेवाट, पोलीस ठाण्यांची रंगरंगोटी, अभ्यांगत कक्ष, नाविण्यपूर्ण उपक्रम हे निकष लावण्यात आले होते. त्यात एक, दोन आणि तीन क्रमांकाची कामगिरी करणाऱ्या पोलीस ठाण्यांचे अभिनंदन करीत आयुक्तांनी त्यांना हे सातत्य टिकविण्यासाठी प्रोत्सादन दिले.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९५.१० टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, १२ कॉलेजचा निकाल शंभर टक्के । Maharashtra HSC 12th Result 2025
– ‘दैनिक मावळ’ संवाद : ज्येष्ठ नाट्यकलाकार व नाट्यप्रशिक्षक प्रकाश पारखी यांच्याशी खास बातचीत । Drama instructor Prakash Parkhi
– पुणे-लोणावळा तिसर्या-चौथ्या मार्गिकेचे काम वेगाने पुढे जाणार, रेल्वेकडून डीपीआर तयार ; केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती